Himachal Pradesh Election 2022: 'मिशन रिपीट'साठी पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्री करणार प्रचार

भाजप-काँग्रेसची स्टार प्रचारकांची यादी जाहीर; कॉंग्रेसकडून सोनिया, राहुल, प्रियांका प्रचार करणार
Himachal Pradesh Election 2022
Himachal Pradesh Election 2022Dainik Gomantak

Himachal Pradesh Election 2022: हिमाचल प्रदेशात सत्ता राखण्यासाठी भाजपने 'मिशन रिपिट' अंतर्गत आपल्या 40 स्टार कॅम्पेनर्सची यादी प्रसिद्ध कली आहे. 'मिशन रिपीट'साठी स्वतः पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्र्यांची फौजही आखाड्यात उतरणार आहे. भाजपने निवडणूक आयोगाकडे ही स्टार प्रचारकांची यादी दिली आहे.

Himachal Pradesh Election 2022
Uttarakhand News: 'या' कारणामुळे केदारनाथ मंदिराचे दरवाजे 25 ऑक्टोबरला राहतील बंद

हे 40 कॅम्पेनर्स 12 दिवस प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापुर्वीच हिमाचल प्रदेशात मंडी, कुल्लु, धर्मशाला, उना येथे चार मोठ्या सभा घेतल्या आहेत. अनेक विकासकामांचे भूमिपुजन आणि उद्घाटनही केले आहे.

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी प्रचारात उतरणार आहेत. काँग्रेसने नुकतेच या राज्यातील निवडणुकीसाठी त्यांच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जारी केली आहे.

भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी देखील हिमाचल प्रदेशात प्रचारासाठी येणार आहेत. या दोघांव्यतिरिक्त काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सरचिटणीस प्रियंका गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, आनंद शर्मा, मुकुल वासनिक, राजीव शुक्ला, भूपेंद्र सिंह हुड्डा आणि हरिश रावत यांचाही या स्टार प्रचारकांमध्ये समावेश आहे.

याशिवाय हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह, विरोधी पक्षनेते मुकेश अग्निहोत्री, काँग्रेस प्रचार समिती अध्यक्ष सुखविंदर सिंह सुक्खू, रणदीप सिंह सुरजेवाला, विप्लव ठाकुर, सचिन पायलट, राज बब्बर, दीपेंद्र हुड्डा, पवन खेड़ा, कर्नल धनीराम शांडिल, प्रताप सिंह बाजवा हे देखील या यादीत आहेत.

Himachal Pradesh Election 2022
Cyclone Sitrang: ऐन दिवाळीत 'सितरंग' चक्रीवादळाचा धोका, IMD चा अलर्ट

अझरुद्दीन करणारी राजकीय फटकेबाजी

हिमाचलच्या राजकीय आखाड्यात भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन देखील प्रचारातून फटकेबाजी करताना दिसणार आहेत. तर 31 ऑक्टोबर रोजी कुल्लु येथे प्रियांका गांधींचा रोड शो होणार आहे. त्यानंतर मंडीत त्यांची सभादेखील होणार आहे.

असा आहे हिमाचल प्रदेशचा निवडणूक कार्यक्रम

25 ऑक्टोबर- अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस

27 ऑक्टोबर- अर्ज छाननी

29 ऑक्टोबर- अर्ज माघारीचा अखेरचा दिवस

12 नोव्हेंबर- मतदान

8 डिसेंबर- निकाल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com