Kiccha Sudeep: अभिनेता किच्चा सुदीपचा मोठा निर्णय, 'अशाप्रकारे' करणार गायींची सेवा

दाक्षिणात्य सुपरस्टार किच्चा सुदीप पुण्यकोटी दत्तू योजनेअंतर्गत 31 गायी दत्तक घेणार आहे.
Kiccha Sudeep
Kiccha SudeepDainik Gomantak

दाक्षिणात्य सुपरस्टार किच्चा सुदीप पुण्यकोटी दत्तू योजनेअंतर्गत 31 गायी दत्तक घेणार आहे. त्याच्या या कृतीमुळे त्याच्या फॅनमध्ये तो बराच चर्चेत आलाय. कर्नाटकचे पशुसंवर्धन मंत्री प्रभू भामला चव्हाण यांनी पुण्यकोटी दत्तक पोर्टलद्वारे लोकांना प्रति गाय 11,000/- रुपये देऊन कोणत्याही गोशाळेतून गायी दत्तक घेण्याचे आवाहन केले होते. यालाच प्रतिसाद देत किच्चा सुदीप पुण्यकोटी दत्तू योजनेअंतर्गत कर्नाटकच्या प्रत्येक जिल्ह्यातून एक अशा 31 गायी दत्तक घेणार आहे.

'गोशाळांचे संवर्धन करणे' हा या प्रकल्पाचा उद्देश समोर ठेऊन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या योजनेची सुरुवात केली. पशुसंवर्धन मंत्री प्रभू भामला चव्हाण यांनीही या योजनेसाठी तेथील जनतेला आव्हान केले होते. गायींच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या कामाचं सुपरस्टार किच्चा सुदीप याने कौतुक केलं.

किच्चा म्हणाला,"मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी यंदा त्यांच्या वाढदिवसानिमित्त 11 गायी दत्तक घेतल्या आहेत. तसेच प्रभू चव्हाण यांनीदेखील 31 गायी दत्तक घेतल्याची घोषणा केली. त्यांना पाहून मीदेखील प्रत्येक जिल्ह्यातील एक गाय दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे". राज्य सरकारने पुण्यकोटी दत्तू योजनेच्या अँम्बिसीडरपदी किच्चा सुदीपची निवडही केली आहे.

Kiccha Sudeep
Amit Shah CAA Remark: 'CAA लागू होणार नाही, असे स्वप्न पाहणारे...,'

कर्नाटकातील 215 हून अधिक खाजगी गोशाळांमध्ये गुरांना आश्रय देण्यात आला असून 100 शासकीय गोशाळा सुरू करण्यात येत आहेत. या सर्व गोशाळांमध्ये पाळीव व संकरित गुरे, गरजू, थकलेली, म्हातारी, आजारी, शेतकऱ्यांनी सोडून दिलेली, नर, वासरे आणि कोर्टाने जप्त केलेली व पोलिस कोठडीत असलेली जनावरे यांचा आश्रय व पालनपोषण करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com