सुपरस्टार रजनीकांतने दिले निवडणुकीच्या राजकारणावर पुनर्विचाराचे संकेत

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

६९ वर्षीय सुपरस्टारने पुढे बोलताना सांगितले की, मी ‘रजनी मक्कल मंदरम’शी याबाबत मत बोलेन आणि आपल्या राजकीय कलाची घोषणा योग्यवेळ आल्यावर करणार, असेही ते यावेळी म्हणाले.

चेन्नई- सुपरस्टार रजनीकांतने निवडणुकीच्या राजकारणावर पुनर्विचाराचे संकेत दिले आहेत. योग्य वेळ आल्यावर आपण यावर निर्णय घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सोशल मीडियावर त्यांच्या नावाने लीक झालेल्या एका लेटरमुळे त्यांना हा खुलासा केला आहे. संबंधित पत्र त्यांनीच लिहिले असल्याचा विश्वास कित्येक लोकांना वाटला होता. मात्र, हे पत्र त्यांनी लिहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘हे पत्र मी लिहिले नाही. मात्र, यात माझ्या प्रकृती विषयी डॉक्टरांचे जे मत प्रदर्शित करण्यात आले आहे ते सत्य आहे.’ असेही त्यांनी यावेळी म्हटले.

६९ वर्षीय सुपरस्टारने पुढे बोलताना सांगितले की, मी ‘रजनी मक्कल मंदरम’शी याबाबत मत बोलेन आणि आपल्या राजकीय कलाची घोषणा योग्यवेळ आल्यावर करणार, असेही ते यावेळी म्हणाले. मागच्या दोन वर्षांपासून निरनिराळ्या राजनैतिक मुद्यांमध्ये रजनी आपले मत मांडत आहेत. मात्र, त्यांचे चित्रपटसृष्टीतील सहकारी कमल हसन यांच्या तुलनेत त्यांच्या राजकारणाला उशीर होत राहिला आहे. कमल हसन यांनी लोकसभा निवडणुकीच्यावेळी आपल्या पक्षाचे उमेदवार दिले होते.  

रजनीकांत यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, ते येत्या काही दिवसांत आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर व्हर्चूअल बैठक घेतील आणि डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये आपल्या राजकारणातील प्रवेशाचा निर्णय घेतील. सुपरस्टार रजनी यांचे विधान निवडणुकांच्या बरोबर सात महिन्यांआधी आले आहे. या निवडणुकीपासून ते आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात करतील, अशी चर्चा सर्वत्र होत आहे. निवडणुकीच्या राजकारणा त्यांचा प्रवेश हा तेथील राजकारणातील ‘एक्स- फॅक्टर मानला जात आहे. राज्यात याआधीही अनेक फिल्मस्टार निवडणुकीच्या राजकारणात यशस्वी झाले असल्याचा इतिहास आहे.                  

संबंधित बातम्या