Ramcharitmanas Row: 'रामचरितमानसवर बंदी घाला, त्यात बकवास...', सपा नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Comment on Ramcharitmanas: समाजवादी पक्षाचे नेते आणि एमएलसी स्वामी प्रसाद मौर्य यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
Swami Prasad Maurya
Swami Prasad MauryaDainik Gomantak

Comment on Ramcharitmanas: समाजवादी पक्षाचे नेते आणि एमएलसी स्वामी प्रसाद मौर्य यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. रामचरितमानसबाबत बोलताना त्यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. तुलसीदासांच्या रामायणावर बंदी घालावी, असे त्यांनी म्हटले आहे. ज्या पुराणमतवादी साहित्यात दलितांवर अत्याचार झाले आहेत, त्यावर बंदी घालावी.

स्वामी प्रसाद मौर्य पुढे म्हणाले की, जर सरकार तुलसीदासांच्या रामायणावर बंदी घालू शकत नसेल तर ते श्लोक रामायणातून काढून टाकावेत.

स्वामी प्रसाद म्हणाले की, 'कित्येक कोटी लोक रामचरितमानस वाचत नाहीत. तुलसीदासांनी आपल्या आनंदासाठी हे लिहिले आहे.' स्वामी प्रसाद एवढ्यावरच थांबले नाहीत. सरकारनेच (Government) यावर बंदी घालावी, असेही ते म्हणाले.

Swami Prasad Maurya
Karnataka:'एक हजार मोदी आले तरी...' कुमारस्वामींचा 'योगी मॉडेल' वर हल्लाबोल

दुसरीकडे, वादग्रस्त वक्तव्य करताना सपा नेत्याने पुढे सांगितले की, 'तुलसीदासांच्या रामायणात असे काही भाग आहेत, ज्यावर आमचा आक्षेप आहे. कोणत्याही धर्मात कोणालाही शिवीगाळ करण्याचा अधिकार नाही. तुलसीदासांच्या रामायणात एक चौपई आहे. यामध्ये ते शूद्रांना खालच्या जातीचे असल्याचा दाखला देत आहेत.'

Swami Prasad Maurya
Bulldozer Action: योगी स्टाइलमध्ये खट्टर सरकार, कुख्यात गुंडाच्या 3 मजली कोठीवर कारवाई

शेवटी मौर्य म्हणाले की, ब्राह्मण दुष्ट, वासनांध, निरक्षर किंवा अशिक्षित असू शकतो, परंतु जर तो ब्राह्मण असेल तर त्याला पूजनीय म्हणतात. पण शूद्र कितीही शिक्षित किंवा ज्ञानी असला तरी त्याचा आदर करु नका. हा धर्म आहे का?'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com