होम आयसोलेशनमध्ये ऑक्सिजन लेवल मेंटेन ठेवण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने दिल्या खास टिप्स

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

देशभरात ऑक्सिजनची उपलब्धता आणि पुरवठा यावर ओरडा सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सामान्य लोकांसाठी काही विशेष पद्धती अवलंबण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये आपणास ऑक्सिजनची कमतरता कशी भरून काढता येईल हे देखील सांगितले आहे.

नवी दिल्ली: कोरोनाने सगळ्या जगभर पुन्हा थैमान घातले आहे. जगासह देशात सुध्दा कोरोनाचा हाहाकार बघायला मिळत आहे. देशभरात कोरोना संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रूग्णांना ऑक्सिजनची गरज आहे, परंतु देशभरात ऑक्सिजनची उपलब्धता आणि पुरवठा यावर ओरडा सुरू आहे. ऑक्सिजन पुरवठा कमी पडत आहे अशा वेळी, कोरोनाचा धक्का बसल्यानंतरही आपण आपआपल्या घरात विलिगिकरणाची सोय केली आहे. असे केल्याने आपण स्वत:ची आणि कुटूंबियांची पण चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सामान्य लोकांसाठी काही विशेष पद्धती अवलंबण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये आपणास ऑक्सिजनची कमतरता कशी भरून काढता येईल हे देखील सांगितले आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या मते, प्रोनिंग ही एक अशी प्रक्रिया आहे जी रुग्णाला त्याच्या पोटाच्या भारावर लेटून पूर्ण करावी लागते. ही प्रक्रिया वैद्यकीयदृष्ट्या स्वीकार्य आहे ज्यामुळे श्वासोच्छ्वास सुधारतो आणि ऑक्सिजन लेवल ला सपोर्ट होते. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या कोरोना रूग्णासाठी प्रोनिंग खूप उपयुक्त आहे.

कोरोना रूग्णाला श्वास घेताना त्रास होत असताना ही प्रक्रिया अवलंबली पाहिजे, ऑक्सिजनची पातळी (SpO2) 94 पेक्षा कमी झाली असेल तर फोटोमध्ये दाखविल्या प्रमाणे प्रोनिंग करण्यासाठी गळ्याखाली एक उशी ठेवा. नंतर छातीच्या खाली एक किंवा दोन उशा ठेवा आणि दोन उशा पायाच्या पुढील भागाखाली ठेवाव्यात. 

आपण होम आयसोलेशन मध्ये असल्यास, वेळोवेळी आपली ऑक्सिजन पातळी (SpO2) तपासून पहा. या व्यतिरिक्त ताप, रक्तदाब, ब्लड शुगर हे देखील वेळोवेळी मोजले पाहिजे. योग्य वेळी योग्य प्रक्रियेनुसार प्रोनिंग करणे खूप मदतीतचे ठरू शकते. अनेक लोकांचा जीव वाचविण्यात प्रोनिंग मदत करते. 

पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघात संध्याकाळपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा शिल्लक 

जर आपण स्वत: प्रोनिंग करत असाल तर आपल्याला चार-पाच उशा लागेल. प्रोनिंग दरम्यान या अवस्थेत 30 मिनिटांपेक्षा जास्त काळ राहू नये हे लक्षात ठेवा. जेवण केल्यानंतर किमान एक तासानंतरच या प्रक्रियेचे अनुसरण करा.
आपण तर गर्भवती असाल, ह्रदयाची मोठी शस्त्रक्रिया झाली असेल, पाठीचा कणा किंवा शरीराचा कोणता भाग फ्रॅक्चर असेल तर ही प्रक्रिया करू नका असा सल्ला ही आरोग्य विभागाने दिला आहे. यामुळे आपल्या शरीराला नुकसान होऊ शकते.   

संबंधित बातम्या