काश्मिरी पंडितांच्या हत्येनंतर पुलवामा येथे SPO रियाझ अहमद यांच्यावर गोळीबार

काश्मीरमध्ये काही तासांतच टार्गेट किलिंगची ही दुसरी घटना आहे.
Members of Kashmiri Pandit Employees protest
Members of Kashmiri Pandit Employees protestANI

जम्मू-काश्मीरमध्ये शांतता निर्माण झाल्यानंतर पुन्हा एकदा दहशतवादी घटना वाढल्या आहेत. काल काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर आज दहशतवाद्यांनी पोलीस हवालदार रियाझ अहमद यांच्यावर गोळ्या झाडल्या ज्यात ते गंभीर जखमी झाले. रियाझच्या घरावर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे. सध्या रियाझ अहमद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खोऱ्यातील पुलवामा येथील गुडुरा भागात ही घटना घडली. काश्मीरमध्ये काही तासांतच टार्गेट किलिंगची ही दुसरी घटना आहे. (Budgam Kashmiri Pandit Killing)

Members of Kashmiri Pandit Employees protest
Jammu and Kashmir: दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून केली हत्या

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाझ अहमद ठोकर हे त्याच्या गुडुरा येथील घरी होता. दरम्यान, दहशतवाद्यांनी लक्ष्य बनवून त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार रियाझ अहमद यांची प्रकृती चिंताजनक आहे.

काश्मिरी पंडित यांच्या हत्येनंतर निदर्शने

गुरुवारी रात्री 36 वर्षीय काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर रात्री उशिरापर्यंत निदर्शने सुरू होती. छावणीत राहणाऱ्या काश्मिरी पंडितांनी या हत्येविरोधात रास्ता रोको करून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यासोबतच केंद्र सरकारवर अपयशाचा आरोप करण्यात आला. अनेक ठिकाणी मेणबत्त्या पेटवून निदर्शने करण्यात आली.

Members of Kashmiri Pandit Employees protest
काश्मिरी पंडिताच्या हत्येच्या निषेधार्थ बारामुल्ला-श्रीनगर महामार्गावर निदर्शने

दहशतवादी टार्गेट किलिंग करत आहेत

दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग करत आहेत. रियाझ अहमदवर झालेला हल्लाही त्याचाच एक भाग असल्याचे दिसते. यापूर्वी खोऱ्यात दहशतवाद्यांनी ज्याप्रकारे हत्या केल्या होत्या, त्यावरून यावेळी दहशतवादी लक्ष्य करून हत्या करत असल्याचे दिसून येत आहे. काल काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची हत्या झाली, त्यानंतर आज पोलीस हवालदार रियाझ अहमद यांना लक्ष्य करण्यात आले. याआधी शनिवारी अली जान रोडवर असलेल्या आयवा ब्रिजवर दहशतवाद्यांनी एका पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com