क्रीडामंत्री किरेन रिजिजू कोरोना पॉझिटिव्ह

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 18 एप्रिल 2021

कोरोनाची पुन्हा तपासणी झाल्यानंतर माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यातच केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी रिजिजू यांनी सोशल मिडियावरील ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. ''कोरोनाची पुन्हा तपासणी झाल्यानंतर माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी क्वारंटाइन व्हावे आणि स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी. मला शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त वाटत आहे,’’ असे रिजिजू यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. (Sports Minister Kiren Rijiju Corona Positive)

शुक्रवारी रिजिजू उत्तराखंडला एका कार्यक्रमानिमित्त गेले होते. उद्घाटन कार्यक्रमामध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत त्यांच्याबरोबर होते. रावत नुकतेच कोरोनातून सावरले आहेत. त्याचबरोबर रिजिजू यांनी गुरवारी उत्तरकाशी जिल्ह्यातील निलोंग व्हॅली प्रदेशाला भेट दिली होती. यात ते इंडो-तिबेट सीमा पोलिस महासंचालक सुरजितसिंग देसवाल त्यांच्याबरोबर होते.

रिलायन्स नंतर टाटा स्टील सुध्दा सरकारच्या मदतीला धावले

क्रीडा व्यतिरीक्त, रिजिजू यांच्याकडे आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी सिध्द आणि होमिओपॅथीचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. रिजिजू अरुणाचलप्रदेशच्या अरुणाचल पश्चिम मतदारसंघाचे लोकसभेचे खासदार आहेत.
 

संबंधित बातम्या