देशात पाच राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव
Spread of bird flu in five states in the country

देशात पाच राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव

नवी दिल्ली: कोरोना संसर्गाशी लढा सुरू असताना देशात पाच राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव झाला असून तो अन्य राज्यातही पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मत्स्यव्यवसाय आणि पशुपालन मंत्री गिरीराज सिंह यांनी देशात बर्ड फ्लूची लागण स्थलांतरित पक्ष्यांमुळे झाल्याचे म्हटले आहे.

सध्या व्यक्तींत बर्ड फ्लूचा संसर्ग झाला नसला तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, केरळ, हरियाना आणि मध्यप्रदेश या राज्यांत केंद्र सरकारने तपासणी पथके पाठविली आहेत. सिंह म्हणाले की, जगभरात बर्ड फ्लूचा आजार दिसून येतो. परंतु भारताने सप्टेंबरमध्येच देश बर्ड फ्लूमुक्त असल्याचे जाहीर केले होते.

ऑक्टोबरमध्ये थंडीच्या काळात स्थलांतरित पक्ष्यांचे देशात आगमन होत असल्याने याबाबत खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली होती. सध्या देशातील ज्या भागात स्थलांतरित पक्ष्यांचे वास्तव्य होते, तेथेच बर्ड फ्लूचा प्रसार झाल्याचे आढळून आले आहे. 

आणखी वाचा:

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com