लॉकडाऊनबद्दल सोशल मीडियावर चुकीची माहिती प्रसारित करणं 'सीएला भोवल'

दैनिक गोमंतक
मंगळवार, 6 एप्रिल 2021

देशातील कोरोना प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वेगाने वाढ होताना दिसते आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राज्यांत कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत तर दुसऱ्या बाजूला अशा परिस्थितीत देशाच्या निरनिराळ्या भागांत निर्बंध घातल्याच्या अफवा सुद्धा मोठ्या प्रमाणात पसरताना  दिसत आहेत.

देशातील कोरोना प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वेगाने वाढ होताना दिसते आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राज्यांत कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत तर दुसऱ्या बाजूला अशा परिस्थितीत देशाच्या निरनिराळ्या भागांत निर्बंध घातल्याच्या अफवा सुद्धा मोठ्या प्रमाणात पसरताना  दिसत आहेत. सोशल मीडियावर लॉकडाऊनबाबत अनेक चुकीची माहिती व्हायरल होत आहे. (Spreading false information about the lockdown on social media proved to be dangerous)

लॉकडाऊन (Lockdown) बद्दल वेगवेगळ्या प्रकारे लोक टीका टिपणी करताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र या विषयावरची चुकीची टीका टिपणी किंवा चुकीची माहिती प्रसारित करणे तुमच्यासाठी धोकादायक  ठरू शकते. तेलंगणामध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्याचा दावा करणारा बनावट सरकारी आदेश सोशल मीडियावरून प्रसारित केल्याप्रकरणी एका चार्टर्ड अकाउंटंटला (सीए) अटक करण्यात आली आहे.शहर पोलिस आयुक्त अंजनी कुमार यांनी पत्रकारांना यांनी  दिलेल्या माहिती नुसार आरोपीने 1 एप्रिल 2021 रोजी तेलंगणाच्या मुख्य सचिवांच्या नावाने बनावट सरकारी आदेश तयार केला आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये टाकला. मुख्य सचिव सोमेश कुमार यांनी असे कोणतेही शासकीय आदेश दिले नसल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून तपासादरम्यान सीएला अटक करण्यात आलेली आहे. तसेच  त्याच्याकडून लॅपटॉप व फोन जप्त करण्यात आलेला आहे.

Breaking News : उत्तर भारतात जाणवले भूकंपाचे धक्के 

आरोपीने चार दिवसांपूर्वी त्याच्या लॅपटॉपवर साथीचा रोग अधिनियम अंतर्गत पूर्वी लागू केलेल्या लॉकडाऊनशी संबंधित सरकारी आदेश (Goverment) डाउनलोड केले होते.त्यानंतर त्यांनी लॉकडाऊन तारखा बदलून 2021 केली आणि ती आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शेअर केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्या ग्रुपच्या सदस्यांनी या व्हॉट्सअ‍ॅप (Whattsapp) ग्रुपमार्फत हा शासकीय आदेश त्यांच्या इतर  व्यक्तींकडे पाठविल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

संबंधित बातम्या