अखेर स्पुटनिक-व्ही भारतात दाखल; लसीकरणाला मिळणार बळकटी

दैनिक गोमंतक
गुरुवार, 13 मे 2021

लसींच्या तुटवड्यामुळे कोरोनाविरुद्धची लढाई कमकुवत होताना दिसत होती.

भारतातील कोरोना लसीकरबद्दल (Covid19 Vaccination) महत्वाची माहिती समोर आली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये भारताकडे आता तिसरे हत्त्यार सुद्धा लवकरच येणार आहे. काही दिवसांपासून रशियन बनावटीची स्पुटनिक-व्ही (Sputnik-V) ही लस भारतात येण्याबद्दल वेगवेगळे अंदाज लावले जात होते. त्यातच आज ही लस भारतात दाखल झाली असल्याची माहिती नीती आयोगाच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता कोरोना विरुद्धच्या लढाईत भारताला मोठी मदत होणार असल्याचे समजते आहे. (Sputnik-v  arrives in India.)

'' जर लसीचं नसतील तर आम्ही फाशी घ्यायची का?'' केंद्रीय...

एकीकडे देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, दुसऱ्या बाजूने या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण करण्यावर सरकार भर देते आहे. मात्र लसींच्या तुटवड्यामुळे कोरोनाविरुद्धची लढाई कमकुवत होताना दिसत होती. त्यातच आता स्पुटनिक-व्ही लसीबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार नीती आयोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य व्ह.के पॉल यांनी दिलेल्या माहिती नुसार स्पुटनिक-व्ही लसीचा साठा भारतात येण्यास सुरुवात झाली असून, आज ही लस भारतात दाखल झाली आहे. 

'स्पुटनिक-व्ही ही लस भारतात दाखल झाली असून, मला ही माहिती देताना अत्यंत आनंद होत आहे. आपल्याला अपेक्षा आहे की, रशियाकडून सध्या जो साठा पुरवला गेला आहे तो पुढच्या आठ्वड्यापर्यंत लसीकरणासाठी उपलब्ध होईल', अशी माहिती व्ही. के पॉल यांनी पुढे दिली आहे. त्यामुळे आता लसीच्या कमतरतेचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार असल्याची माहिती मिळते आहे. 

संबंधित बातम्या