हैद्राबादमध्ये दिली स्पुटनिक व्हीची पहिली लस; जाणून घ्या किंमत

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 14 मे 2021

हैद्राबादच्या डॉ. रेड्डीज लॅबच्या कस्टम सर्व्हिसेसचे ग्लोबल हेड दीपक सपरा यांनी हि पहिली लस दिली आहे.

भारतातील कोरोना लसीकरबद्दल (Covid19 Vaccination) महत्वाची माहिती समोर आली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये भारताकडे आता तिसरे हत्त्यार सुद्धा लवकरच येणार आहे. काही दिवसांपासून रशियन बनावटीची स्पुटनिक-व्ही (Sputnik-V) ही लस भारतात येण्याबद्दल वेगवेगळे अंदाज लावले जात होते. त्यातच काल ही लस भारतात दाखल झाली असल्याची माहिती नीती आयोगाच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली होती. त्यामुळे आता कोरोना विरुद्धच्या लढाईत भारताला मोठी मदत होणार असल्याचे समजते आहे. आज देशात स्पुटनिक-व्ही लसीचे पहिले लसीकरण झाले आहे. (Sputnik V vaccine was first given in Hyderabad)

Covid-19 in children: लहान मुलांमधील कोरोनाची लक्षणे कशी ओळखाल? पालकांनी काय...

भारतात सध्या कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी एकमेवर उपाय असलेल्या लसीकरणारसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र या लसीकरणाच्या मोहिमेत कमतरता भासत असल्याने मोठ्या अडचणी येत होत्या. मात्र आता रशियन बनावटीची  हैद्राबादच्या डॉ. रेड्डीज लॅबच्या कस्टम सर्व्हिसेसचे ग्लोबल हेड दीपक सपरा यांनी हि पहिली लस दिली आहे. डॉ. रेड्डीज लॅबने शुक्रवारी ही माहिती दिली आहे. रशियन बनावटीची लस स्पुटनिक व्ही चे सॉफ्ट लाँचिंग सुरु झाले असून, आज पहिली लस हैद्राबादमध्ये देण्यात आल्याचे रेड्डीज लॅब कडून सांगण्यात आले आहे. 

काय असणार लसीची किंमत?
स्पुटनिक व्ही ही रशियन बनावटीची  लस भारतात पोहोचली असून असून पहिली लस सुद्धा देण्यात आली आहे. सध्या या लसीची किंमत बाजारात ९४८ रुपये आहे. त्यामुळे ही लस सध्यातरी कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन यास लसींपेक्षा महाग असल्याचे दिसते आहे.  

संबंधित बातम्या