सिरम इन्स्टिट्यूटमध्ये 'स्पुटनिक व्ही' लसीची निर्मिती होणार; DCGIने दिली परवानगी

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 4 जून 2021

स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती करणारी सिरम इन्स्टिट्यूट सहावी कंपनी आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना हा फैलाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. कोव्हॅक्सिन (Covaxin), कोविशील्डनंतर(Covishield) रशियाच्या स्पुटनिक व्ही(Sputnik V.) लसीला मान्यता देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये आता स्पुटनिक व्ही लसीच्या निर्मितीला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DGCI)  परवानगी दिली आहे.  

आता सीरम इन्स्टिट्यूट(Serum Institute) या परवानगीनंतर स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती करणार आहे. स्पुटनिक व्ही लसीचं परिक्षण, चाचणी करण्यास डीसीजीआयने मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता कोविशील्डनंतर स्पुटनिक व्ही लस निर्मिती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतचं वृत्त एएनआय दिले आहे. या मंजुरीनंतर स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती करणारी सिरम इन्स्टिट्यूट सहावी कंपनी आहे. स्पुटनिक व्ही लस निर्मितीसाठी मॉस्कोच्या गमलेया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ अपिडेमियॉलॉजी मायक्रोबायोलॉजीसोबत करार करण्यात आला आहे. (The Sputnik V vaccine will be produced at the Serum Institute Permission granted by DCGI)

Corona Vaccination : विदेशी लसींना आता भारतात चाचण्यांची गरज नाही

सध्या भारतात डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजद्वारे (Dr. Reddy's Laboratory) स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन घेतलं जात आहे. आत्तापर्यंत स्पुटनिक व्ही लसीला 50 हून अधिक देशात मान्यता आहे. स्पुटनिक व्ही लसीचा एक डोस भारतात 948 रुपयांना उपलब्ध होणार आहे. त्यावर पाच टक्के जीएसटी आकारण्यात येणार असल्याने त्याची किंमत 995 रुपये 40 पैसे इतकी असेल असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे रशियन बनावटीची ही लस भारतामध्ये सरासरी एक हजार रुपयांना उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्पुटनिक व्ही लसीचा पहिला साठा रशियामधून 1 मे रोजी भारतामध्ये दाखल झाला होता. स्थानिक औषध प्रशासनाने त्याला 13 मे रोजी मान्यता देण्यात आली होती. भारतीय कंपन्यांच्या माध्यमातूनही स्पुटनिक व्ही लसींची निर्मिती करण्यात येणार आहे. अनेक संशोधनामध्ये ही लस 90 परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे.
 

संबंधित बातम्या