तिसऱ्या टप्प्यांतही कलंकित उमेदवार

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातही गुन्हेगारांना तिकिटे देण्याची परंपरा सर्व पक्षांनी तेवढ्याच जोमाने पाळल्याचे दिसून आले आहे. ‘नॅशनल इलेक्‍शन वॉच’ आणि लोकशाही हक्कांसाठीची अभ्याससंस्था-एडीआर यांच्या पाहणीनुसार तिसऱ्या टप्प्यातील ११९५ पैकी ३१ टक्के म्हणजे ३७१ उमेदवारांविरुद्ध गंभीर व त्यातही ४० टक्के म्हणजे २८२ उमेदवारांवर अतिगंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे त्यांनीच प्रतिज्ञापत्रात मान्य केले आहे. 

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातही गुन्हेगारांना तिकिटे देण्याची परंपरा सर्व पक्षांनी तेवढ्याच जोमाने पाळल्याचे दिसून आले आहे. ‘नॅशनल इलेक्‍शन वॉच’ आणि लोकशाही हक्कांसाठीची अभ्याससंस्था-एडीआर यांच्या पाहणीनुसार तिसऱ्या टप्प्यातील ११९५ पैकी ३१ टक्के म्हणजे ३७१ उमेदवारांविरुद्ध गंभीर व त्यातही ४० टक्के म्हणजे २८२ उमेदवारांवर अतिगंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे त्यांनीच प्रतिज्ञापत्रात मान्य केले आहे. 

सत्तारुढ भाजप-जदयू व कॉंग्रेस यांच्यासह प्रमुख पक्षांनी गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांवर विश्‍वास ठेवला. या टप्प्यात राजद-भाजप-कॉंग्रेस यादीतील तर सुमारे दोन तृतीयांश उमेदवार गुन्हे दाखल असलेले आहेत. भाजप व कॉंग्रेसबाबत तर अशा गुन्हेगारांचे प्रमाण ७६ टक्‍क्‍यांपर्यंत व राजदबाबत ते ७३ टक्‍क्‍यांपर्यंत जाते. या टप्प्यात ९ महिलांना तिकिटे देण्यात आली. एडीआरचे संस्थापक जगदीश चोकर यांनी आज अहवाल सादर करताना सांगितले, की ३१ टक्के उमेदवारांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत त्यातील २४ टक्के उमेदवारांवर खून, बलात्कार व अपहरणासारखे गंभीर गुन्हेही आहेत. सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगारांना तिकिटे देण्याबाबत दिलेल्या निर्देशांचे सर्रास उल्लंघन होताना दिसते.

गुन्हेगारांना उमेदवारी देणे याबाबत न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचेही चोकर यांनी सांगितले. यंदा गुन्हेगारांना तिकीट देण्यामागील एक वेगळेच कारण मुख्य पक्षांनी शोधून काढले. ते म्हणजे, त्यांनी कोरोना काळात चांगले काम केले म्हणून त्यांना तिकिटे दिली. मात्र काम व गुन्हेगारी यांचा तिकीट वाटपाशी कसा संबंध जोडता येतो असा सवाल उपस्थित केला आहे. 

कलंकित उमेदवारांचे प्रमाण (कंसातील आकडे टक्क्यांत)

गंभीर गुन्हे असलेले उमेदवार               
    
राजद -४४ पैकी २२,                 
    भाजप- ३४ पैकी २२
    कांग्रेस २५ पैकी १४
    लोजपा ४२ पैकी ११
    जदयू ३७ पैकी ११
    बसपा १९ पैकी ४
    
  अतिगंभीर गुन्हे असलेले उमेदवार 
    राजद -४४ पैकी २२, 
    भाजप- ३४ पैकी २२
    कांग्रेस २५ पैकी १४
    लोजपा ४२ पैकी ११
    जदयू ३७ पैकी ११
    बसपा १९ पैकी ४

आज दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदारसंघापैकी काही ठिकाणी २०१५ च्या निवडणुकीत विजयाचा मतांचा फरक हा २ टक्क्यांपेक्षा कमी राहिला आहे.

  चनपटिया
विजयाचा फरक : ०.३० 
विजय : भाजप : ३९.०४
पराभूत : जेडीयू : ३८.७४

  शिओहार
विजयाचा फरक : ०.३१ 
विजयी : जेडीयू : २९.७१
पराभूत : हम : २९.४०

  बरौली
विजयाचा फरक : ०.३३
विजयी : राजद : ४०.४५
पराभूत : भाजप : ४०.१२

  झंझारपूर
विजयाचा फरक : ०.५३
विजयी : राजद : ४०.७३
पराभूत : भाजप : ४०.२०

  बिहारशरीफ
विजयाचा फरक : १.३१
विजयी : भाजप : ४२.७३
पराभूत : जेडीयू : ४१.४२

  पाटणासाहिब
विजयाचा फरक : १.४९
विजयी : भाजप : ४६.८९
पराभूत : राजद : ४५.४०

  बेतिया
विजयाचा फरक : १.५७ 
विजय : काँग्रेस : ४५.२६
पराभूत : भाजप : ४३.६९

    नालंदा
विजयाचा फरक : १.८५
विजयी : जेडीयू : ४४.७८
पराभूत : भाजप : ४२.९३

 

 

संबंधित बातम्या