Startup: व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविलेल्या एक्स-रे मधून होणार कोरोना रूग्णांची ओळख

Xray Setu
Xray Setu

नवी दिल्ली: स्टार्टअपने(Startup) कोरोना रूग्णांना(Covid-19) लवकर शोधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित प्लॅटफॉर्म 'एक्स-रे सेतु'(Xray Setu) विकसित केला आहे. यात, छातीच्या एक्स-रेच्या रिझोल्यूशन छायाचित्रातून देखील डॉक्टर रोगाचे निदान लावू शकणार आहे.(Startup Xray Setu to identify Covid 19 positive patients)

व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवा एक्स-रे 
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने बंगळूर आधारित आरोग्य-टेक स्टार्टअप निरामय आणि भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग यांच्या सहकार्याने इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एक्स-रे सेतू सुविधा तयार केली आहे. अशी माहीती बुधवारी एका निवेदनून जारी केली गेली आहे. या सुविधेच्या मदतीने, स्टार्टअपने व्हॉट्सअ‍ॅपवर(WhatsApp) पाठविलेल्या छातीच्या एक्स-रे छायाचित्रामधून कोरोना संक्रमित रूग्णांची ओळख पटली आहे.

त्वरीत रुग्ण ओळखण्यास सक्षम 
स्टार्टअपनुसार,  एक्स-रे सेतु त्वरीत रिझल्ट देते आणि हे सेतू अॅप वापरण्यास देखील सुलभ आहे. यामुळे ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांची त्वरीत ओळख पटण्यास मदत होऊ शकते. ज्या डॉक्टरांकडे एक्स-रेची सुविधा आहे त्यांना याचा जास्त लाभ होण्याची शक्यता आहे.  एक्स-रे सेतुमध्ये, प्रभावित भागांचे विश्लेषण केले जाते आणि रंगांच्या मदतीने (हीटमॅप) आढावा घेतला जातो. हे एक्स-रे सेतु डॉक्टरांसाठी उपयुक्त आहे, जेणेकरून त्यांना मानवी शरीरातील स्थितीबद्दल सहज माहिती मिळेल.

1000 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण 
इंग्लंडच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने या प्रक्रियेनुसार 1,25,000 पेक्षा जास्त एक्स-रे छायाचित्रे तपासली आहेत. तसेच एक्स-रे सेतूवरुन एक हजाराहून अधिक भरती कोरोना रुग्णांची माहिती प्राप्त झाली आहे. या प्रक्रियेद्वारे मिळविलेल्या डेटाची संवेदनशीलता 98.86 टक्के आहे आणि अचूकता 74.74 टक्के आहे.

10-15 मिनिटांत रिपोर्ट तयार

एक्स-रे सेतु, स्टार्ट-अप निरामय आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISC) च्या सहकार्याने विकसित झालेल्या कोविड-19 ला साध्या एक्स-रेच्या मदतीने शोधून काढणे जाणे सोपे झाले आहे. सध्या कोणतेही शुल्क न आकारता बॅकएंडमध्ये एआय सिस्टम वापरणार असल्याचे आर्टपार्कचे(Department of Science and Technology backed startup Artpark) मुख्य कार्यकारी अधिकारी उमाकांत सोनी यांनी  पीटीआयला सांगितले.

एखाद्या व्यक्तीचा छातीचा एक्स-रे डॉक्टर किंवा रेडिओलॉजिस्टने एक्स-रे सेतुच्या व्हॉट्सअॅप बॉटवर अपलोड केला ज्याद्वारे छआयाचित्राचे विश्लेषण केले जाते आणि 10-15 मिनिटांत रिपोर्ट तयार होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com