अहमदाबादच्या नामकरणावरून सुब्रमण्यम स्वामींचा पंतप्रधान मोदींना घरचा आहेर

अहमदाबादचे नाव कर्णावती न केल्याबद्दल व्यक्त केलं आश्चर्य
Subramanian Swamy
Subramanian SwamyDainik gomantak

योगी आदित्यनाथ सरकारने मुख्यमंत्री झाल्या - झाल्या पुर्वाधाच्या टप्यात उत्तरप्रदेशातील अनेक शहरांच्या नामांतराचा धडाकाच लावला होता. यामुद्यावरुन उत्तर प्रदेश सरकार आणि वरोधी पक्ष यांच्यात तणावाच वातावरण ही निर्माण झालं होतं. मात्र तरी ही या नंतर उत्तर प्रदेशातील अनेक शहरांचे नामांतर ही केले गेले. तसेच गेल्या काही वर्षांपासून, शहरांची नावे बदलून त्यांची प्राचीन नावं ठेवण्याची मागणी वाढत आहे. (Statement made by Subramaniam Swamy on the naming of Ahmedabad )

Subramanian Swamy
'सरकारचं वचन', आंदोलनानंतर माजी सैनिकांचं पेन्शन बँक खात्यात होणार जमा

भाजपच्या राजवटीत हे काम वेगाने होत आहे. अनेक शहरांची नावेही बदलण्यात आली आहेत. यामध्ये अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या अशी उदाहरणं आहेत. याच क्रमाने गुजरातची राजधानी अहमदाबादचे नाव बदलून कर्णावती करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. गेल्या मार्चमध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीतही यावर चर्चा झाली आणि राजधानीचे नाव कर्णावती ठेवण्याची मागणी जोरदारपणे करण्यात आली.

Subramanian Swamy
देवासारखा धावला शेजारी म्हणून वाचला 7 वर्षाच्या मुलीची जीव, मारण्यासाठी धावले होते दंगलखोर

आता भाजपाचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नामकरणाच्या प्रश्नावरून स्व-पक्षाची कानउघडणी करत भाजपला घरचा आहेर दिला आहे. अहमदाबाद शहराचे नाव बदलून कर्णावती न केल्याबद्दल भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

स्वामी म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी स्वत: ते सुचवले होते, पण आता ते स्वतः ते करत नाहीत, असं ट्वीट त्यांनी केलं आहे. तर सरकार नाव बदलण्याच्या प्रक्रियेला उशीर का करत आहे, असा सवाल भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. केंद्रात आणि गुजरातमध्ये भाजपाची सरकारे आहेत. मात्र यासाठी का उशीर होतो हे समजणे अनाकलनीय असल्याचं ही म्हणाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com