प्रशांत भूषण यांचे वक्तव्य अधिक अपमानजनक : सर्वोच्च न्यायालय

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

प्रशांत भूषण यांनी २००९ मधील त्यांच्या विधानावर खेद व्यक्त केला पण बिनशर्त माफी मागितली नाही. ते म्हणाले होते की त्यावेळी मी भ्रष्टाचार म्हणायचे नव्हते तर ते कर्त्यव्य बजावत नाहीत. २००९ मध्ये एका मुलाखतीत वकील भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्तींना भ्रष्ट म्हटले होते.

नवी दिल्ली: प्रशांत भूषणच्या न्यायालयाच्या अवमान प्रकरणात अ‍ॅटर्नी जनरल यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले की भूषण यांना इशारा देण्यात यावा परंतु त्यांना शिक्षा देऊ नये.  याला उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की प्रशांत भूषण यांनी जे वक्तव्य केले ते अधिक अवमानकारक आहे. 

गेल्या सुनावणीत प्रशांत भूषण यांनी २००९ मधील त्यांच्या विधानावर खेद व्यक्त केला पण बिनशर्त माफी मागितली नाही. ते म्हणाले होते की त्यावेळी मी भ्रष्टाचार म्हणायचे नव्हते तर ते कर्त्यव्य बजावत नाहीत. २००९ मध्ये एका मुलाखतीत वकील भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्तींना भ्रष्ट म्हटले होते.

न्यायमूर्ती अरुण मिश्रा म्हणाले, 'ट्विटचे औचित्य सिद्ध करण्यासाठी त्यांचे उत्तर वाचणे खूप वेदनादायक आहे. हे पूर्णपणे अन्यायकारक आहे. प्रशांत भूषण यांच्यासारख्या वरिष्ठ सदस्यांकडून ही अपेक्षा नाही. भूषण यांचा तीस वाऱ्यापेक्षा जास्त वकिलीचा अनुभव आहे. आशा व्यक्तीने असे म्हटले तर लोकांना वाटते की ते जे बोलत आहेत ते खरे आहे. याकडे सहज दुर्लक्ष केले जाऊ शकते परंतु जेव्हा प्रशांत भूषण सारखे वकील काही बोलतात तेव्हा त्याचा सामान्य जनतेवर काही परिणाम होत असतो.

तत्पूर्वी, सुनावणीदरम्यान अ‍ॅटर्नी जनरल म्हणाले की, अनेक माजी न्यायाधीश न्यायपालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल बोलले आहेत. म्हणून भूषणला इशारा देण्यात यावा. अशी विधाने केवळ न्यायालयाला सांगण्यासाठीच केली जातात, अशी विधाने पुन्हा करु नका अशी चेतावणी देऊन त्यांना सोडून द्यावे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या