केंद्राकडून राज्यांना रेमडिसिव्हीर इंजेक्शन मिळणार नाही; जाणून घ्या कारण

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 29 मे 2021

राज्यांना थेट कंपनीकडून रेमडिसिव्हीर इंजेक्शन खरेदी करावेत असं स्पष्ट केले आहे.

देशात कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) ओसरली असताना मागील दोन महिन्यात वाढती कोरोना रुग्णांची संख्या आणि अपुऱ्या वैद्यकीय उपकरणांमुळे मृतांचे रोज नवे विक्रम प्रस्थापित होत आहेत. तसेच रेमडिसिव्हीर (Remdesivir) आणि ऑक्सिजनची (Oxygen) मागणीही वाढली आहे. त्यामुळे रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार वाढला होता. पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकत रेमडिसिव्हीर इंजेक्शन जप्त केले होते. मात्र रेमडिसेव्हीर इंजेक्शनचे उत्पादन घटल्याने इंजेक्शन मिळणं कठीण झालं आहे. त्यामुळे केंद्र सरकार राज्यांना (State) रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा करत होते. मात्र आता मोदी सरकारने (Modi Government) राज्यांनी थेट कंपनीकडून रेमडिसिव्हीर इंजेक्शन खरेदी करावे असे स्पष्ट केले आहे. केंद्रीय रसायन राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी याबाबतची माहिती दिली आहे. (States will not receive remedisivir injections from the center Know the reason)

''मला तुम्हाला सर्वांना सांगण्यास आनंद होत आहे की, रेमडिसिव्हीर इंजेक्शनचं उत्पादन दहा पटीने वाढलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे हे शक्य झालं. 11 एप्रिल 2021 रोजी 33 हजार रेमडिसिव्हीर इंजेक्शनची निर्मीती होत होती. आता हेच उत्पादन साडे तीन लाखांपर्यंत पोहोचले आहे,'' असं ट्विटमध्ये मनसुख मंडाविया (Mansukh Mandaviya) यांनी म्हटलं आहे.

'15 लाखांसाठी भारतीय सात वर्षापासून वाट पाहतायत;' तुम्हीही थोडी...

 सुरुवातीस रेमडिसिव्हर इंजेक्शन तयार करणारे 20 कारखाने होते. त्यानंतर आता ही संख्या 60 वर पोहोचली आहे. त्यामुळे इंजेक्शनचा मागणीपेक्षा जास्त पुरवठा होत आहे. त्यामुळे राज्यांना रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, असही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. तसेच नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग आणि सीडीएससीओला रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या उपलब्धतेवर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. दुसऱ्या दिवशीही देशात दोन लाखांहून कमी रुग्णांची नोंद झाली आहे. तासात एकूण 1.73 लाख नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. मागील 45 दिवसातील सर्वात कमी आकडेवारी आहे. या कालावधीमध्ये 3617 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या सलग 16 व्या दिवशी बाधित रुग्णांपेक्षा जास्त आहे. मागील एका दिवसामध्येच 2.48 लाख रुग्ण बरे झाले आहेत. यासह भारतामध्ये सध्या रिकव्हरी रेट 90 टक्क्यापर्यंत पोहोचला आहे. आणि  तो वेगाने वाढण्याची अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे. सध्या एकूण 22, 28,724 सक्रीय रुग्ण आहेत.

संबंधित बातम्या