कांद्यासाठी २५ टनांची साठवण मर्यादा

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

अनेक राज्यांतील  कांद्याचे दर १०० रुपये किलोपर्यंत पोहोचल्यामुळे धाबे दणाणलेल्या केंद्र सरकारने आज अधिसूचना जारी करून व्यापाऱ्यांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत २५ टनांची साठवण मर्यादा लागू केली आहे.

 

नवी दिल्ली : अनेक राज्यांतील  कांद्याचे दर १०० रुपये किलोपर्यंत पोहोचल्यामुळे धाबे दणाणलेल्या केंद्र सरकारने आज अधिसूचना जारी करून व्यापाऱ्यांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत २५ टनांची साठवण मर्यादा लागू केली आहे. नाशवंत शेतीमालास साठवण मर्यादेच्या बाहेर ठेवणारा सुधारित जीवनावश्यक वस्तू कायदा मंजूर केल्यानंतर अवघ्या काही आठवड्यात कांद्याचे दर कडाडले होते. त्यामुळे केंद्र सरकारवर साठवण मर्यादा लागू करण्याची वेळ ओढवली आहे. 

धुराळणीचे निकष शिथिल
केंद्र सरकारने निर्यातबंदीच्या निर्णयानंतर दोन दिवसांपूर्वी  कांदा आयातीस प्रोत्साहन देण्यासाठी आयातीचे निकषही शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच केंद्राच्या बफर साठ्यामधील कांदाही खुल्या बाजारात आणण्याचे जाहीर केले होते. कांद्याच्या आयातीसाठी सरकारने कांदा उत्पादक देशांमधील भारतीय वकिलातींना तेथील निर्यातदारांशी संपर्क साधण्यास सांगितले असून आयात होणाऱ्या कांद्यावर औषध धुराळणीचे (फ्युमिगेशन) निकषही शिथिल केले आहेत.

संबंधित बातम्या