"देवाच्या पाण्यामुळे कोरोना बरा होतो" या अफवेला बळी पडून जमली तुफान गर्दी

दैनिक गोमंतक
गुरुवार, 3 जून 2021

कोरोनाच्या भीतीमुळे लोक अंधश्रद्धेला देखील बळी पडत असल्याचे पाहायला मिलते आहे.

देशात सध्या कोरोना (Covid19) संक्रमनाची दुसरी लाट (Second Wave) सुरू असुन या काळात लोकांना मोठ्या अडचणींना सामोरा जावे लागते आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत या लाटेत मृत्युच्या (Death) प्रमाणात वाढ झाली असल्याने लोकांच्या मनात भीती निर्मीण झाली आहे. याच भीतीमुळे लोक अंधश्रद्धेला (Superstition) देखील बळी पडत असल्याचे पाहायला मिलते आहे. अशीच एक अफवा मध्यप्रदेशच्या राजगढ (Rajgarh) जिल्ह्यात पसरली आहे. चाटूखेडा गावातील एका मंदीरात देवाच्या परीने दिलेले पाणी पिल्याने कोरोना बरा होतो अशी अफवा पसरल्याने मोठी गर्दी जमल्याचे पाहायला मिळते आहे. (The storm surged after rumors spread that God's water healed Corona in MP)

मंदीर परिसरात बुधवारी सकाळी 11 वाजेनंतर आसपासच्या गावातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. दोन महिलांच्या शरिरात देवांच्या पऱ्या येत असल्याची अफवा पसरली होती. यावेळी झालेल्या गर्दीत कोरोना प्रतिबंधक नियम पायदळी तुडवल्याचे दिसते आहे. अंगात परी संचारल्या असल्याचे म्हणत या महिलांनी लोकांच्या अंगावर पाणी शिंपडले आणि आता तुम्हाला कोरोना होणार नाही, तर जे लोक कोरोना बाधित झाले आहेत, ते सुद्धा बरे होतील असे सांगितले. अंधश्रद्धा आणि निष्काळजीपणामुळे झालेल्या गर्दीमुळे कोरोना अजुनच वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. 

अंत्यसंस्कार केलेली महिला 15 दिवसांनी घरी पोहोचली अन सगळेच घाबरले

या घटनेचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर त्याठिकानी पोहोचुन पोलीसांनी जमावाला पांगवले. तसेच पोलीसांनी त्याठिकानी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी देखील गंभीर दखल घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना या प्रकरणावर कडक भूमिका घेऊन दोषींच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले.  त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी अंधश्रद्धा पसरवल्या प्रकरणी दोन जणांविरुद्ध तक्रार दाखल केली.    
 

संबंधित बातम्या