1100 वर्षांपूर्वींच्या मंदीरातील रुग्णालयाची कहाणी; इथं सर्जरीही केली जायची

दैनिक गोमंतक
गुरुवार, 20 मे 2021

या केंद्रामध्ये दोन फिजिशियन होते, एक शल्यचिकित्सक आणि एक न्हावी होता जो किरकोळ शस्त्रक्रिया करत असे.

कोरोना महामारीच्या (Coronavirus) काळात रुग्णालये जीवनरक्षक म्हणून ओळखली जात आहेत. जवळजवळ 1000 वर्षांपूर्वी मंदिरे रुग्णालयांची भूमिका निभावत असत. दक्षिण भारतातील चोल साम्राज्याचा तो काळ होता. मंदिराच्या भिंतीवर लिहिलेल्या शिलालेखांवरून ही गोष्ट समोर आली आहे. राजाने स्थापित केलेल्या रुग्णालयात 15 बेड होते, ज्यांची देखरेख शल्यचिकित्सक आणि डॉक्टर करत असत. वेंकटेश पेरुमल मंदिराच्या भिंतींवर लिहिलेल्या माहितीनुसार, चेन्नईपासून 70 कि.मी. अंतरावर वीरराजेंद्र चोल यांनी ई.स.वी सन 1069 मध्ये चेयार, वेगवती आणि पालर नद्यांच्या संगमावर एक वैद्यकीय केंद्र बांधले होते. येथे डॉक्टरांना त्यांच्या परिश्रमानुसार धानच्या स्वरूपात पगार मिळायचा. तिथे कोणत्या प्रकारची हर्बल औषधे वापरली जात होती याच्या देखील नोंदी आहेत.(The story of the temple hospital 1100 years ago)

उपचारासाठी फिजीशियन, सर्जन येथे होते
या केंद्रामध्ये दोन फिजिशियन होते, एक शल्यचिकित्सक आणि एक न्हावी होता जो किरकोळ शस्त्रक्रिया करत असे. दोन लोक औषधी वनस्पती आणत असत. रूग्णांची काळजी घेण्यासाठी नर्स आणि मेडिकल अटेंडंट्सची देखील सोय होती. हे शिलालेख मंदिराच्या भिंतीवर सुमारे 540 चौरस फूट क्षेत्रात 55 फूट उंच आहेत. त्यात 33 ओळी आहेत. भारतीय खंडात आढळणारा हा सर्वात मोठा प्राचीन शिलालेख आहे. त्यातील 95 टक्के भाग तमिळ भाषेत आहे, बाकीचे ग्रंथात लिहिलेले आहे.

ताप, फुफ्फुसांच्या आजारांवर उपचार केले जात
पुरातत्वशास्त्रज्ञांनी 19 हर्बल औषधांची नोंद करून ठेवलेली आहे. जी ताप, फुफ्फुसाचा रोग आणि जलोदरच्या उपचारांसाठी वापरली जात होती. या शिलालेखात असे लिहिले आहे की वसतिगृहात राहणारे विद्यार्थी आणि मंदिराचे कर्मचारी येथे उपचार घेत असत.

संबंधित बातम्या