Strange solution of BJP ministers If the yajna is performed at 10 am the third wave of corona will not come
Strange solution of BJP ministers If the yajna is performed at 10 am the third wave of corona will not come

भाजप मंत्र्यांचा अजब उपाय; ''सकाळी 10 वाजता यज्ञ केल्यास कोरोनाची तिसरी लाट येणार नाही''

देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्याचबरोबर आरोग्य सुविधांचा तुटवडा कमी पडू नये यासाठी राज्यांमध्ये युध्दपातळीवर काम सुरु आहे. यातच आता मध्यप्रदेशमध्येही (Madhya Pradesh) कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी मागील काही दिवसांपूर्वी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी देशातील सर्वच राज्यांचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या यंत्रणा काम करत आहेत. असं असताना मात्र काही नेते अजब विधाने करताना दिसत आहेत.  (Strange solution of BJP ministers If the yajna is performed at 10 am the third wave of corona will not come)

उत्तरप्रदेशातील (Uttar pradesh) एका गोमूत्र प्रासन केल्याने कोरोनाचा संसर्ग झालेला बरा होतो असा दावा केला होता. यावरुन बराच मोठा वादंग निर्माण झाला होता. हा वादंग शांत होत नाही तोपर्यंत सतत वक्त्व्यामुळे चर्चेत असणाऱ्या भाजपाच्या मंत्री उषा ठाकूर (Usha Thakur) यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी एक अजब सल्ला दिला आहे. कोरोनाची लाट रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी सकाळी 10 वाजता यज्ञ करावा असा सल्ला ठाकूर यांनी दिला आहे.

देशातीाल इतर राज्यांप्रमाणे मध्य़प्रदेशलाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. भोपाळबरोबर अन्य शहरांमध्ये कोरोनामुळे शेकडो लोकांचा मृत्यू होत आहेत. भोपाळमध्ये कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कोरोना रुग्णांचे फोटो देशात तसेच जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. आता मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सरकार कोरोनाची तिसरी लाटेला तोंड देण्यासाठीचं नियोजन करत आहेत. असं असतानाच राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी कोरोनाची तिसरी लाटेला रोखण्यासाठी यज्ञ करणं ही भारताची सनातन परंपरा असल्याचं सागंत किती वाजता यज्ञ केला पाहिजे हे सांगितले आहे.

''यज्ञ केल्यावर कोरोनाची तिसरी लाट भारताला स्पर्श सुध्दा करणार नाही. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्र सरकारने तसेच राज्यांनी सर्व तयारी केली आहे. आपण सगळेजण मिळून कोरोनाची लाट आटोक्यात आणू,'' असा विश्वास ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com