प्रदूषण कराल..तर गजाआड !

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश जारी केला आहे. कोरोना काळात व हिवाळ्यात प्रदूषण पसरविण्यास दोषी आढळतील त्यांना १ कोटी रूपयांपर्यंत दंड व ५ वर्षांच्या कारावासाच्या अतिशय कडक शिक्षेची तरतूद यामध्ये आहे. 

नवी दिल्ली : प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश जारी केला आहे. कोरोना काळात व हिवाळ्यात प्रदूषण पसरविण्यास दोषी आढळतील त्यांना १ कोटी रूपयांपर्यंत दंड व ५ वर्षांच्या कारावासाच्या अतिशय कडक शिक्षेची तरतूद यामध्ये आहे. 

प्रदूषण निर्मूलन व प्रतिबंधासाठी निवृत्त न्यायाधीश मदन लोकूर यांच्या अध्यक्षतेखाली १८ सदस्यांचा हवेच्या गुणवत्ता व्यवस्थापसाठी एक विशेष आयोगही नेमण्यात आला आहे. 

प्रदूषणाविरूद्ध लढाईत केंद्र तडजोड करणार नाही, असे सांगून सरकारने सर्वोच्च न्यायालयाला २६ ऑक्‍टोबरला याबाबतची माहिती दिली होती. महाधिवक्ता तुषार मेहता यांनी आज सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या पीठासमोर नवा अध्यादेश सादर केल्यावर त्याच्या अध्ययनासाठी आठ दिवस लागतील, असे सांगून न्यायालयाने पुढील शुक्रवारी पुढील सुनावणी ठेवली आहे. दर वर्षी हिवाळ्यात दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये प्रदूषणाची पातळी घातक अवस्थेपर्यंत जाते. दिल्लीशेजारच्या राज्यांत शेतातील काडीकचरा जाळण्यामुळे होणारा धूर दिल्लीकरांना श्‍वास घेणेही कठीण करून टाकतो.

संबंधित बातम्या