Viral Video: 'कल कॉलेज बंद हो जायेगा' गाण्यावर स्टंट करणं तरुणाला पडलं महागात

कॉलेजबाहेर मुलींसमोर स्टंट करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं.
Viral Video: 'कल कॉलेज बंद हो जायेगा' गाण्यावर स्टंट करणं तरुणाला पडलं महागात
YoungDainik Gomantak

कॉलेजबाहेर मुलींसमोर स्टंट करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं. तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. हे प्रकरण गाझियाबादच्या सिहानी गेट पोलीस स्टेशन परिसरातील आहे. हा व्हिडीओ सुशीला इंटर कॉलेजच्या बाहेर बनवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. इथे एक मुलगा कॉलेजच्या मुलींसमोर (Girls) स्टंट करत आहे. त्याचा व्हिडिओही तयार करण्यात आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे, ज्यामध्ये 'कल कॉलेज बंद हो जायेगा' हे बॉलिवूड गाणं बॅग्राऊंडरला वाजत आहे. (Stunt in front of girls outside college is expensive for a young man police caught after VIDEO went viral)

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. आरोपी 20 वर्षीय दुष्यंत कुमार हा मूळचा बुलंदशहरचा आहे. मात्र सध्या तो बदलपूरमध्ये राहत आहे. मुलींना टशन दाखवण्यासाठी त्याने हा व्हिडिओ बनवला.

Young
Viral Video|जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरताना स्फोट, दोन मजुरांचा वेदनादायक मृत्यू

शिवाय, गाझियाबादचे (Ghaziabad) एसपी सिटी निपुण अग्रवाल म्हणाले, 'सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सुशीला इंटर कॉलेजच्या (College) बाहेरुन मुली जेव्हा निघतात, तेव्हा एका मुलगा माकड उड्या मारत त्यांच्यासमोर येतो. पोलिसांनी व्हिडिओची दखल घेत आरोपीची ओळख पटवून ताब्यात घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com