सीबीआय आधिकारी दिसणार नव्या ड्रेसकोड मध्ये...असा असणार नवा ड्रेसकोड

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 4 जून 2021

सीबीआय कर्मचाऱ्यांठी आता नवा ड्रेसको़ड निर्धारित करण्यात आला आहे. त्यानुसार आता सीबीआय कर्मचाऱ्यांना जींस पॅंट, टी-शर्ट, स्पोर्टस शुज घालता येणार नाही.

सीबीआय (CBI) अर्थात राष्ट्रीय गुन्हेअन्वेशन विभाग हा नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. सीबीआयने आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकरणांत केलेल्या कामगीरीमुळे केंद्रीय गृहविभागाअंतर्गत येणाऱ्या या खात्याचे सर्वांनाच आकर्षण असते. आता सीबीआयचा युनिफॉर्म बदलणार असल्याचे समजते आहे. सीबीआयचे संचालक सुबोध कुमार जायस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांनी याबद्दलचा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे. (Subodh Kumar Jaiswal's decision to change CBI uniforms)

सीबीआय कर्मचाऱ्यांठी आता नवा ड्रेसको़ड निर्धारित करण्यात आला आहे. त्यानुसार आता सीबीआय कर्मचाऱ्यांना जींस पॅंट, टी-शर्ट, स्पोर्टस शुज घालता येणार नाही. नव्या ड्रेस कोड नुसार सीबीआयमधील पुरुष कर्मचाऱ्यांना फॉर्मल शर्ट आणि पॅंट तसेच फॉर्मल शुज घालावे लागणार आहेत. एवढेच नाही, तर आता सीबीआय कर्मचाऱ्यांना क्लीन शेव्ह करावे लागणार आहे. महिला सीबीआय कर्मचाऱ्यांना देखील आता साडी, सुट आणि फॉर्मल शर्ट घालावा लागणार आहे. 

अखेर GOOGLE ने 'त्या' चुकीबद्दल कन्नडिगांची मागितली माफी

सीबीआयचे महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी पदभार स्वीकारताच काही दिवसांत हा निर्णय घेतला असुन अनूप टी मॅथ्यु यांनी या संदर्भातील आदेश देखील काढले आहेत. त्यानुसार आता जींस पॅंट, टी-शर्ट, स्पोर्टस शुज घालण्याची मुभा नसणार आहे. या आदेशात सीबीआयच्या सर्व शाखांच्या प्रमुखांना या आदेशाचे सक्तीने पालन केले जाईल याची काळजी घेण्यास सांगितले आहे. (India)

संबंधित बातम्या