'सुब्रमण्यम स्वामी यांचा भाजपला घरचा आहेर'

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

भारत आणि  चीन  यांच्यातील पूर्व लडाख सीमेवरील तणाव काहीसा निवळला आहे.

नवी दिल्ली: भारत आणि  चीन  यांच्यातील पूर्व लडाख सीमेवरील तणाव काहीसा निवळला आहे. पॅंगॉंग सरोवराच्या उत्तर आणि  दक्षिण भागातून भारत आणि  चीन  यांच्याकडून  सैन्य  मागे घेण्याची सुरुवात  झाली आहे. पॅगॉंग  सरोवराच्या भागात चीनने आक्रमण केल्यानंतर भारत आणि चीनचे सैन्य  समोरा-समोर आले होते. त्यानंतर भारत आणि चीन यांच्यातील सीमावीवाद शिगेला जाण्याची चिन्हं दिसत असतानाच दोन्ही देशांकडून सैन्य मागे घेण्यासाठी सहमती झाली आहे. मात्र सीमावीवादावरुन झालेल्या या घडामोडीनंतर भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. सीमावीवादासंबंधी अनेक सवाल उपस्थीत करत पंतप्रधानांवर हल्ल्बोल केला आहे.

''2020 मध्ये पंतप्रधान यांनी  म्हटले होते की, सीमेवर कोणीही आलेले नाही, आणि कोण़ी गेलेले नाही. मात्र पंतप्रधानांचे हे वक्तव्य़ चीनला खूप आवडले होते. मात्र हे सत्य नव्हंत. लष्करप्रमुख नरवणे यांना आदेश देण्यात आले की, एलएसी पार जावून पॅंगॉंग सरोवर ताब्यात घ्यावा, जेणेकरुन भारतीय लष्करांना चीनच्या चौक्यांवर नजर ठेवता येण्य़ासाठी सहजता निर्माण होईल. मात्र डेपसांगच्य़ा भागातून चीनने सैन्य मागे घेण्याचे काय झाले? चीन मात्र अत्यंत खूश आहे’’ अशा टोला सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला लगावला.

भारतीय सुरक्षा सल्लागारांच्या जीवाला धोका; पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून हल्ल्याचं...

सुब्रमण्यम स्वामी यांना तुम्ही केलेल्या ट्वीटवर तुमचा काय अंदाज आहे असं विचारलं असता, ''सध्याच्या स्थितीत सैन्य माघार घेणे हे आत्मसमर्पण करण्यासारखे आहे. हे सारं चीनला खूश करण्यासारखे आहे. चैबरलेननं अशाच प्रकारे हिटलरला शांततमय चर्चेतून खूश केलं होते. जेव्हा आपण लष्करी सामर्थ्यांने सज्ज असू, तेव्हा एकच घोषवाक्य असलं पाहिजे ते म्हणजे, पीएलएल हटवा (चीनी सैन्यांना). तोपर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात येवू नये.''असं स्वामी यावेळी म्हणाले.     

संबंधित बातम्या