26 मे ला आकाशात पहावयास मिळणार 'सुपर मून'

दैनिक गोमंतक
सोमवार, 24 मे 2021

26 मे रोजी चंद्र (Moon) आपल्या सामान्य आकारा पेक्षा सुमारे 7 टक्क्यांनी मोठा दिसणार आहे. याशिवाय त्याची चमक देखील सामान्य दिवसापेक्षा सुमारे 16 टक्के अधिक असेल, कारण या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल, तसेच या दिवशी पौर्णिमा देखील आहे.  त्यामुळे या सुपर मूनला (Super Moon) लोकांना सहज पाहता येणार आहे.

नवी दिल्ली :  26 मे रोजी चंद्र (Moon) आपल्या सामान्य आकारा पेक्षा सुमारे 7 टक्क्यांनी मोठा दिसणार आहे. याशिवाय त्याची चमक देखील सामान्य दिवसापेक्षा सुमारे 16 टक्के अधिक असेल, कारण या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल, तसेच या दिवशी पौर्णिमा देखील आहे.  त्यामुळे या सुपर मूनला (Super Moon) लोकांना सहज पाहता येणार आहे. यावेळी आकाश (Sky) देशील स्वच्छ असेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ('Super Moon' to be seen in the sky on May 26)

चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या प्राण्यांच्या निवाऱ्याची पुन्हा उभारणी 

26 मे ला दुपारी 1.53 ला चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असून, शास्त्रज्ञांच्या (Scientist) मते यावेळी चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर 3 लाख 57 हजार 309 किमी इतके असेल. या दिवशी आपल्याला चंद्राचे सायंकाळी 6.54 च्या सुमारास आकाशात दर्शन होणार आहे. त्यामुळे लोकांना सूर्यास्तासोबत, सुपर मूनची शितलता अनुभवता येईल. इतरवेळी पृथ्वीपासून चंद्राचे अंतर सुमारे 3 लाख 84 हजार 400 किमी आहे. एकवेळ अशीही येते की पृथ्वीपासून चंद्राचे अंतर 4 लाख 5 हजार 696 किमीपर्यंत वाढते त्याला अपोगी असे म्हणतात, पण ज्यावेळी चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पृथ्वीच्या अगदी जवळ येतो त्याला वैज्ञानिक पेरिगी असे संबोधतात. यात पृथ्वीपासून चंद्राचे अंतर सुमारे 3 लाख 57 हजार 000 किमा पर्यंतच राहते. त्या पौर्णिमा असेल तर आपल्याला हा सुपर मून दिसतो. 26 मे ला देखील या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडून येणार आहेत. पेरिगीच्यावेळी पौर्णिमा असणे चांगली घटना मानली जाते.  

संबंधित बातम्या