नुपूर शर्माला मोठा दिलासा! कोणत्याच राज्यातील पोलिसांनी अटक करू नये- SC

भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी मुहम्मद पैगंबर यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरबाबत पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली
Nupur Sharma Case
Nupur Sharma CaseDainik Gomantak

Prophet Remarks Row: भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी मुहम्मद पैगंबर यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरबाबत पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यांना सद्या न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या कोणत्याही राज्यातील पोलिसांनी नुपुरला अटक करू नये. पुढील सुनावणी 10 ऑगस्ट रोजी होणार आहे, असे आदेश दिले आहे.

हा आदेश देताना खंडपीठाने याचिकाकर्त्याच्या हत्येचे व्हायरल झालेले वक्तव्य सलमान चिश्ती यांचीही दखल घेतली. उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने याचिकाकर्त्याचा शिरच्छेद करण्याची धमकी दिल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यानंतर आज नुपूर शर्मावर कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Nupur Sharma Case
Nupur Sharma Raw: नुपूर शर्माचा व्हिडिओ पाहिल्यामुळे तरुणावर चाकूने वार

आजच्या सुनावणीत नुपूर शर्मांची बाजू मांडणारे वकील मनिंदर सिंग यांनी सांगितले की, त्यांच्या जीवाला गंभीर धोका आहे. यावर न्यायमूर्ती म्हणाले की, 'याचिकेत एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. हा अधिकार उच्च न्यायालयाकडे आहे. आम्ही याचिकाकर्त्याला 1 जुलै रोजी उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले होते. आम्ही तुम्हाला पर्यायी कायदेशीर मार्ग घेण्यास सांगितले, परंतु आमची चिंता अशी आहे की तुम्ही त्या आदेशाचे पालन करण्याच्या स्थितीत नाही.'

Nupur Sharma Case
Haryana: अवैध खाणकाम रोखण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला

याचिकाकर्ता पर्यायी कायदेशीर मार्गाचा अवलंब कसा करील हीच आमची चिंता आहे. आम्ही सर्व पक्षांना त्यांच्या विचारासाठी नोटीस जारी करत आहोत. या प्रकरणी 10 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. पश्चिम बंगालमध्ये आणखी अनेक एफआयआर दाखल झाल्या आहेत. तेथे पोलिसांनी लुकआउट परिपत्रक जारी केले आहे. आपल्या नव्या याचिकेच्या समर्थनार्थ त्यांनी अनेक घटना घडल्याचे सांगितले आहे. अजमेर दर्ग्याचे खादिम सलमान चिश्ती यांनी आपला गळा कापण्याची धमकी देत ​​असल्याचा व्हिडिओ जारी केला आहे. यूपीमधील एका व्यक्तीनेही असा व्हिडिओ जारी केला आहे. तेव्हा देशातील सध्याची परिस्थिती पाहता, कोणत्याही राज्यातील पोलिसांनी नुपूर यांना अटक करू नये, असे आदेश सुर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com