BJP Leader: 'या' भाजप नेत्यावर चालणार बलात्काराचा खटला, SC म्हणाले- तुम्ही चुकीचे नसाल...

Syed Shahnawaz Hussain: बलात्कार प्रकरणी भाजप नेते सय्यद शाहनवाज हुसैन यांना मोठा झटका बसला आहे. हा झटका सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
Syed Shahnawaz Hussain
Syed Shahnawaz Hussain Dainik Gomantak

Syed Shahnawaz Hussain: बलात्कार प्रकरणी भाजप नेते सय्यद शाहनवाज हुसैन यांना मोठा झटका बसला आहे. हा झटका सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी हुसैन यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. शाहनवाज हुसैन यांच्यावर 2018 मध्ये बलात्काराचा आरोप होता. या प्रकरणी ट्रायल कोर्टाने एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते. नंतर दिल्ली उच्च न्यायालयाने हा आदेश कायम ठेवला.

दरम्यान, या प्रकरणाची नीट चौकशी होऊ द्या, तुमची चूक नसेल तर तुमची सुटका होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान सांगितले. न्यायमूर्ती एस. रवींद्र भट आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली.

Syed Shahnawaz Hussain
BJP नेते शहनाबाज हुसैन यांना मोठा झटका, 'बलात्काराचा गुन्हा तात्काळ दाखल करा'

प्रकरण नेमकं काय आहे

2018 मधील ही गोष्ट आहे. त्यानंतर दिल्लीत (Delhi) या महिलेने कथित बलात्कार प्रकरणात भाजप नेते सय्यद शाहनवाज हुसैन यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली. या महिलेने हुसैन यांच्याविरोधातील एफआयआरसाठी कनिष्ठ न्यायालयात अपील केले होते. मात्र, शाहनवाज हुसैन यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले. मॅजिस्ट्रेट कोर्टाने या प्रकरणी निकाल देताना त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी हुसैन यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली असता, त्यांची याचिका फेटाळण्यात आली.

असा युक्तिवाद वकिलांनी केला

शाहनवाज हुसेन यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि सिद्धार्थ लुथरा यांनी युक्तिवाद केला. महिलेच्या वतीने तक्रार करण्यात आल्याचे रोहतगी यांनी यावेळी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला, मात्र काहीही सापडले नाही. हुसैन यांच्यावर अनेक हल्ल्यांची मालिका सुरु करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावर उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले की, आम्हाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही.

Syed Shahnawaz Hussain
कॉंग्रेस केवळ अफवा पसरवण्यापुरता शिल्लक राहिला"भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांचा हल्लाबोल

महिलेने बलात्काराचा आरोप केला होता

विशेष म्हणजे, जून 2018 मध्ये एका महिलेने (Woman) भाजप नेते शाहनवाज हुसैन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. फिर्यादीच्या आरोपानुसार, ही घटना त्याच वर्षी एप्रिल महिन्यात घडली होती. शाहनवाज हुसैन यांनी महिलेला छतरपूर येथील फार्महाऊसवर बोलावल्याचे सांगण्यात आले. यानंतर कोल्ड ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळून प्यायला देण्यात आल्याचे महिलेचे म्हणणे आहे. ती दारुच्या नशेत असताना तिच्यावर बलात्कार झाला. याप्रकरणी महिला एफआयआरची मागणी करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com