Journalist Siddique Kappan: सिद्दीक कप्पला जामीन मंजूर, SC चा निर्णय

सुप्रीम कोर्टाने केरळचे पत्रकार सिद्दीक कप्पनला जामीन मंजूर झाला आहे.
journalist Siddique Kappan
journalist Siddique KappanDainik Gomantak

सुप्रीम कोर्टाने केरळचे पत्रकार सिद्दीक कप्पन (journalist Siddique Kappan) यांना जामीन मंजूर केला ज्यांच्यावर यूपी सरकारने बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

हाथरस प्रकरणात हिंसाचार भडकवण्याचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सिद्दी कप्पनला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. कप्पनला 5 ऑक्टोबर 2020 रोजी मथुरा येथून हातरसला जात असताना अटक करण्यात आली. अलाहाबाद उच्च न्यायालयाने हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत सिद्दीकीला जामीन देण्यास नकार दिला होता. जामीन मंजूर करताना, सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले की सिद्दीकी पुढील सहा आठवडे दिल्लीत राहतील आणि स्थानिक पोलिस ठाण्यात हजर राहतील, त्यानंतर तो केरळला जाऊ शकेल.

यूपी सरकारने सुप्रीम कोर्टात कप्पनच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. यूपी सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले होते. ज्यामध्ये कपन्नचे पीएफआय सारख्या अतिरेकी संघटनांशी संबंध असल्याचे म्हटले होते. कप्पन देशात दहशतवादी आणि धार्मिक हिंसाचार भडकवण्याच्या कटात सामील असल्याचा आरोप यूपी सरकारने केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com