सुप्रीम कोर्टाने कुरानमधील 26 आयते काढून टाकण्याची जनहित याचिका फेटाळली

सुप्रीम कोर्टाने कुरानमधील 26 आयते काढून टाकण्याची जनहित याचिका फेटाळली
Supreme_Court

कुराणमधून 26 आयते हटविण्याशी संबंधित जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यासह याचिकाकर्त्याला 50 हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी जनहित याचिका (पीआयएल) दाखल केली होती आणि सर्वोच्च न्यायालयासमोर कुरान शरीफचे 26 आयते काढण्याची मागणी केली होती. रिझवी यांच्या म्हणण्यानुसार हे विशेष श्लोक मानवांना हिंसक बनवित आहेत आणि दहशतवादाचे शिक्षण देत आहेत.(The Supreme Court has rejected a public interest litigation seeking removal of 26 verses from the Quran)

न्यायमूर्ती फली नरिमन, न्यायमूर्ती बी.आर गवई आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने या खटल्याची सुनावणी केली. कोर्टाने ही याचिका फेटाळून लावत ही याचिका क्षुल्लक असल्याचे म्हटले आहे. याचिकाकर्त्यानी कुराणातील त्या 26 आयत्याने देशाच्या अखंडतेसाठी धोका असल्याचे वर्णन केले होते. पूढे त्यांनी असा युक्तिवाद केला होता की मदरश्यांमध्ये प्रशिक्षण देऊन आतंकवादी तयार केले जात आहेत.

जगातील लोकांना हे आयते सांगून  दहशतवादी बनवले जाते असा दावा वासिम रिझवी यांनी याचिकेत केला होता. या याचिकेनंतर वासिम रिझवी यांना  काही दिवसांपूर्वी झालेल्या इस्लामिक परिषदेतून, ज्यात शिया आणि सुन्नी समुदायाचे उलेमा सहभागी झाले होते त्यात रिझवी यांना इस्लाममधून कडून टाकण्यात आले होते. तसेच देशाच्या कोणत्याही क्रॅबिस्तानमध्ये रिझवी यांना दफन केले जाणार नाही असा हुकूम जारी करण्यात आला होता.

वसीम रिझवी सध्या अंडरग्राऊंड  आहेत. कुटुंबाने त्यांना सोडले आहे, त्यांची पत्नी, मुले व भाऊ या सर्वांनी त्यांना सोडून दिले असल्याचे रिझवी यांनी सांगितले. रिझवींच्या भावाने एक व्हिडिओ प्रसिद्ध करून सांगितले  परिवाराचा आणि वासीमचा काहीही संबंध नाही. पुढे रिझवी यांचा भाऊ म्हणाला ते इस्लामविरोधी बनले आहेत आणि ते जे बोलत आहेत त्याचा कुटूंबाशी काही संबंध नाही.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com