सुप्रीम कोर्टाचा निकाल टाटांच्या पारड्यात; मिस्त्रींबाबतचा निर्णय योग्य (वाचा सविस्तर)
Tata

सुप्रीम कोर्टाचा निकाल टाटांच्या पारड्यात; मिस्त्रींबाबतचा निर्णय योग्य (वाचा सविस्तर)

आज सर्वोच्च न्यायालयाने टाटा सन्सच्या बाजूने निकाल दिला आहे. सायरस मिस्त्री यांच्या संदर्भातील नॅशनल कंपनी लॉ अपीलेट ट्रिब्यूनलचा (एनसीएलएटी) च्या निकालाला स्थगिती लावत सर्वोच्च न्यायालयाने टाटा सन्सच्या बाजूने निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने एनसीएलएटीचा कंपनीच्या अध्यक्षपदी सायरस मिस्त्री यांची नियुक्ती करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केले आहे. टाटा सन्सच्या अध्यक्षपदी मिस्त्री यांना पुन्हा नियुक्त करण्याचा निर्णय एनसीएलटीने 17 डिसेंबर 2019 रोजी घेतला होता. व या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात टाटा सन्सने याचिका दाखल केली होती. एनसीएलटीचा हाच निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने बदलला आहे. (Supreme Court rules in favor of Tata Sons on Cyrus Mistrys petition) 

एनसीएलटीने सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटविण्याच्या निर्णयाला चुकीचे म्हटले होते. एनसीएलएटीने सायरस मिस्त्री यांना पुन्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. त्या विरोधात टाटा सन्सने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 2 जानेवारी 2019 ला टाटा सन्सने ही याचिका दाखल केली होती. 

सायरस मिस्त्री यांना 24 ऑक्टोबर 2016 रोजी टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले होते. यानंतर सायरस मिस्त्री यांनी डिसेंबर 2016 मध्ये कंपनी लॉ ट्रिब्यूनल मध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर जुलै 2018 मध्ये कंपनी लॉ ट्रिब्यूनलने मिस्त्री यांची याचिका फेटाळून लावत टाटा सन्सचा निर्णय कायम ठेवण्याचा निर्णय दिला होता. या विरोधात सायरस मिस्त्री यांनी एनसीएलएटीत तक्रार दाखल केली होती. व डिसेंबर 2019 मध्ये मिस्त्री यांना पुन्हा टाटा सन्सचे अध्यक्षपद देण्याचे आदेश एनसीएलएटी कडून देण्यात आले होते. टाटा सन्सने जानेवारी 2020 मध्ये याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. 

सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांना 24 ऑक्टोबर 2016 रोजी टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटविताना कंपनीने सायरस मिस्त्री यांची कार्यशैली टाटा कंपनीच्या शैलीशी जुळत नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर टाटा समूहाने एन. चंद्रशेखरन यांना टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. तर डिसेंबर 2012 मध्ये रतन टाटा टाटा कंपनीचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त झाले होते. आणि सायरस मिस्त्री यांची अध्यक्षपदी निवड केली होती. 

टाटा सन्समध्ये (Tata Sons) सायरस मिस्त्री यांचा वाटा 18.4 टक्के आहे. तर टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टचा 66 टक्के हिस्सा आहे. त्यामुळे सायरस मिस्त्री हे टाटा ट्रस्ट नंतर सर्वात मोठे दुसरे क्रमांकाचे भागीदार आहेत. टाटा समूहाच्या सर्व कंपन्यांचे उत्पन्न मार्च 2020 मध्ये 7.92 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. तर मार्च 2019 पर्यंत त्यांची मार्केट व्हॅल्यू 11.09 लाख कोटी रुपये होती.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com