प्रायव्हसी पॉलिसीवरून सर्वोच्च न्यायालयाने व्हॉट्सअ‍ॅप,फेसबुकला फटकारले

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

व्हॉट्सअ‍ॅपने जारी केलेल्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपला नोटीस बजावली असून, या धोरणाची अंमलबजावणी तीन महिने पुढे ढकलली आहे. 

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपने जारी केलेल्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपला नोटीस बजावली असून, या धोरणाची अंमलबजावणी पुढील तीन महिने पुढे ढकलली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने आपल्या गोपनीयता धोरणात काही बदल केल्याची घोषणा केल्यानंतर या कंपनीला वापरकर्त्यांकडून कडक टीकेचा सामना करावा लागला होता. या धोरणाला आव्हान देणार्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपकडून प्रतिसाद मागितला आहे.

...वो डरे हैं, देश नहीं! राहुल गांधींनी धरले मोदी सरकारला धारेवर

या याचिकेवर सुनावणी घेत सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नमूद केले की लोकांच्या गोपनीयतेचे रक्षण केले पाहिजे.  खंडपीठाने म्हटले आहे की, नागरिकांना त्यांच्या प्रायव्हसीबद्दल साशंकता आहे आणि त्यांचे मत आहे की त्यांचा डेटा आणि मेसेजेस इतरत्र शेअर होऊ नयेत. याचिकाकर्ता इंटरनेट फ्रीडम फाउंडेशनची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील श्याम दिवाण यांनी खंडपीठाला सांगितले की मेटाडाटा मोठ्या प्रमाणात आहे जो कंपनीच्या फायद्यासाठी शेअर केला जाऊ शकतो,ज्यामुळे वापरकर्त्यांच्या गोपनीयनतेचा भंग होईल. भारतीय वापरकर्त्यांचा डेडा, माहिती फेसबुकला शेअर केली जाऊ नये, अशी आमची मागणी असल्याचं दिवाण म्हणाले.

जानेवारीत व्हॉट्सअ‍ॅपने नवीन गोपनीयता/प्रायव्हसी धोरण आणले होते.ज्यामुळे युरोपातील व भारतातील व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांमध्ये भेदभाव होत असल्याचे सरकारने फटकारले होते. हे धोरण 8 फेब्रुवारी 2021 पर्यंत आणले जाणार होते आणि भारतीयांना नवीन गोपनीयता धोरण मान्य करण्यास सांगण्यात आले होते, अशी माहिती दीवान यांनी दिली. याला स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाने ही मुदत 14 मेपर्यंत वाढविली आहे. काही दिवसांपूर्वी भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (एमईईटी) ने फेसबुकच्या मालकीच्या असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपचे प्रस्तावित बदल मागे घेण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचे ग्लोबल सीईओ विल कॅथकार्ट यांना पत्र लिहिलं होतं.

भगवद्गीता आणि पंतप्रधान मोदींचा फोटो घेऊन नवा उपग्रह अंतराळात झेपावणार

गोपनीयता, डेटा ट्रान्सफर आणि शेअरींग धोरणांबाबतच्या सरकारच्या प्रश्नांवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रतिसाद देण्यास सांगितले होते. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन धोरणाअंतर्गत युजर्सच्या चॅटचा मेटाडेटा इतर फेसबुक कंपन्यांसह शेअर करण्याचा प्रस्ताव करण्यात आला होता. यामुळे मंत्रालयाने वापरकर्त्यांच्या माहितीच्या सुरक्षिततेची चिंता व्यक्त के होती. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्सी पॉलिसीवर प्रश्नदेखील उपस्थित केले होते.

 

संबंधित बातम्या