सुशील चंद्रा नवे मुख्य निवडणूक आयुक्त

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 12 एप्रिल 2021

राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी सुशील चंद्रा यांची 24 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.

नवी दिल्ली: केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्या ते पदभार स्वीकारणार आहेत. सध्या  ते आयुक्त पदावर कार्यरत आहेत. सर्वात वरिष्ठ निवडणूक आयुक्ताला मुख्य निवडणूक आयुक्त बनवण्याच्या परंपरेनुसार सुशील चंद्रा यांचे नाव या पदावर यापूर्वीपासून निश्चित मानले जात होते. (Sushil Chandra is the new Chief Election Commissioner)

सुप्रीम कोर्टाने कुरानमधील 26 आयते काढून टाकण्याची जनहित याचिका फेटाळली

राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी सुशील चंद्रा यांची 24 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. या आगोदर केंद्रीय निवडणूक आयोगाची धुरा सुनील अरोरा यांच्याकडे होती. आता सुशील चंद्रा यांची मुख्य निवडणूक आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ 14 मे 2022 पर्यंत असणार आहे.  14 फेब्रुवारी 2019 रोजी सुशील चंद्रा यांची आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सुशील चंद्रा यांच्या नेतृत्वात उत्तरप्रदेश, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत.    

 

संबंधित बातम्या