सुशील कुमारला आणखी एक झटका!

दैनिक गोमंतक
मंगळवार, 25 मे 2021

छत्रसाल स्टेडियमवर कनिष्ठ सुवर्णपदक विजेता सागर राणा (Sagar Rana) याच्या खून प्रकरणात सुशीलबरोबर त्याचा जोडीदार अजय यालाही अटक करण्यात आली आहे.

ऑलिम्पिक (Olympic) पदक विजेता सुशील कुमारला (Sushil Kumar) खुनाच्या आरोपाखाली (Murder Case) पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. त्यातच आता सुशील कुमारच्या अडचणीत आणखीन वाढ झाल्याचे समजते आहे. छत्रसाल स्टेडियम (Chhatrasal stadium) मध्ये झालेल्या पहिलवान सागर राणा (Sagar Rana) खून प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सुशील कुमारला आता उत्तर रेल्वेने आपल्या सेवेतून निलंबित (Suspended) केले आहे. कारवाईच्या भीतीने फरार झालेल्या सुशील कुमारला पोलिसांनी मुंडका भागात अटक केली आहे. 

छत्रसाल स्टेडियमवर कनिष्ठ सुवर्णपदक विजेता सागर राणा (Sagar Rana) याच्या खून प्रकरणात सुशीलबरोबर त्याचा जोडीदार अजय यालाही अटक करण्यात आली आहे. 4 मे रोजी रात्री उशिरा झालेल्या घटनेपासून हे दोघेही फरार होते. पोलिसांनी सुशीलवर एक लाख रुपये आणि अजयवर 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्याचवेळी रोहिणी कोर्टाने मंगळवारी सुशीलचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यातच आता उत्तर रेल्वेने देखील सेवेतून निलंबित केल्याने सुशीलच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. (Sushil Kumar suspended from railway service)

केंद्र सरकार फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर कारवाईच्या तयारीत

दरम्यान, सुशील कुमार यांच्या प्रतिनियुक्तीची मुदत 2020 मध्ये वाढविण्यात आली होती. त्यानंतर सुशील कुमारने 2021 मध्ये सेवेच्या मुदतवाढीसाठी अर्ज केला होता, परंतु दिल्ली सरकारने त्यांची विनंती नाकारली होती. कोणताही सरकारी अधिकारी जेव्हा एखाद्या गंभीर गुन्ह्यात आरोपी म्हणून सापडतो, तेव्हा प्रकरण सुरु असे पर्यंत सदरील अधिकाऱ्याला निलंबित केले जात असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.  

संबंधित बातम्या