निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचे लाजिरवाणे कृत्य, वर्दी घालून करायचा फसवणूक

पोलीस खात्याचा गणवेश परिधान केलेल्या आरोपीने एका दुकानदाराला त्याच्या बँक खात्यात 16,000 रुपये ट्रान्सफर करून घेतले.
Cyber Crime
Cyber Crime Dainik Gomantak

Delhi Crime: दिल्ली पोलिस खात्यातील माजी पोलिस कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करूनही त्याने लोकांची फसवणूक करण्याचे काम सुरूच ठेवले आहे. पोलीस खात्याचा गणवेश परिधान केलेल्या आरोपीने एका दुकानदाराला त्याच्या बँक खात्यात 16,000 रुपये ट्रान्सफर करून घेतले. नंतर त्याला धमकावून तेथून निघून गेले. पीडितेने उत्तर जिल्हा सायबर पोलिस ठाण्यात तक्रार केल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी माजी हवालदाराला शुक्रवारी अटक केली.

आरोपीचे नाव रोहित दलाल असून तो, झज्जर, बहादूरगडचा रहिवासी आहे. रोहितवर यापूर्वी फसवणुकीचे पाच गुन्हे दाखल आहेत. 2021 मध्ये त्याला दिल्ली पोलिसांतून काढून टाकण्यात आले होते. नुकतीच त्याच्याविरोधात सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार आली. सिव्हिल लाइन्स येथील मजनू का टिला येथील रहिवासी राहुल कुमार सिंग यांनी सांगितले की, आरोपी रोहित या परिसरात सायबर कॅफे चालवतो.

वाहतूक पोलिसांचा गणवेश घातलेला एक तरुण त्यांच्या दुकानात आला. स्वत:च्या मजबुरीचे कारण देत त्याने फोन पेवर 16 हजार रुपये ट्रान्सफर करण्याची विनंती केली. पैसे हस्तांतरित करताच रोख रक्कम देतो, असे राहुलने पोलिस असल्याची ओळख सांगून पैसे ट्रान्सफर करायला सांगतिले, मात्र त्यानंतर तो रोख न देता निघून गेला, अशी तक्रार राहूल कुमार सिंग यांनी दिली.

Cyber Crime
Jharkhand Cash Scandal: काँग्रेसच्या 3 आमदारांसह पाच जणांना अटक

त्याच्याकडे पैसे मागितल्यावर आरोपीने त्याला धमकावले आणि गप्प बसण्यास सांगितले. उत्तर जिल्ह्याचे पोलिस उपायुक्त सागर सिंह कलसी यांनी सांगितले की, तक्रारीनंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. सायबर पोलिस स्टेशनचे प्रभारी पवन तोमर, एसआय रोहित आणि इतरांच्या पथकाने तपास सुरू केला. सायबर कॅफेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. आरोपीचा फोटो पोलिसांना दाखवला, मात्र त्याची ओळख पटली नाही.

नंतर पोलिसांनी तांत्रिक निगराणीची मदत घेतली. यूपीआय आयडीच्या मदतीने तपासात आरोपीचे नाव रोहित दलाल असल्याची माहिती मिळाली. तो पूर्वी दिल्ली पोलिस हवालदार होता, परंतु फसवणुकीच्या अनेक घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याने त्याला काढून टाकण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये दिल्ली पोलिसात हवालदार म्हणून भरती झाला होता. सुरुवातीला तो बटालियनमध्ये तैनात होता. सुरुवातीला त्याने कमी रकमेतून सट्टेबाजी सुरू केली, जी हळूहळू वाढत गेली. नंतर संपूर्ण पगार सट्टेबाजीवर खर्च झाला. आणि त्याने लोकांना लुटणे सुरू केले.

Cyber Crime
Aap Councilor Murder: आम आदमी पक्षाच्या नेत्याची हत्या, जिममध्ये झाडल्या गोळ्या

त्याने आपल्या मित्र आणि नातेवाईकांकडून कर्जही घेतले आणि ते पुर्ण पैसे सट्टेबाजीत लावले. त्यानंतर तेही त्याने गमावले. नंतर आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याने फसवणुकीचा मार्ग निवडला. त्याच्याविरोधात अशोक विहार, आदर्श नगर, बाबा हरिदास नगर आणि जहांगीरपुरी येथे फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. रोहितच्या या कृत्यामुळे त्याला दिल्ली पोलिसांतून हद्दपार करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com