उपसभापती हरिवंश यांचा चहा खासदारांनी नाकारला

वृत्तसंस्था
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

बिहार अस्मितेचा मुद्दा ‘एनडीए’ तापवणार

नवी दिल्ली:  राज्यसभेतील गोंधळावरून निलंबीत झालेल्या आठ खासदारांनी रात्रभर धरणे धरल्यानंतर त्यांना सकाळचा चहा घेऊन उपसभापती हरिवंश आज सकाळीच गांधी पुतळ्याजवळ पोहोचले. त्यानंतर त्यांनी आत्मक्‍लेश म्हणून राष्ट्रपती आणि सभापती वेंकय्या नायडू यांना पत्र लिहून २४ तासांचा उपवास करण्याचा निर्णय जाहीर केला. पंतप्रधानांनी तत्काळ त्यांच्या पत्राची दखल तर घेतलीच पण या मुद्याचा थेट बिहारचा अत्यंत सूचक उल्लेखही केला. धरणे आंदोलन करणाऱ्या खासदारांना काल रात्री जेवण पाठविण्याबाबत सभापतींकडूनही विचारणा केली गेल्याचे वृत्त आहे. या साऱ्यांनी त्यांच्याकडून आलेला प्रस्तावही विनम्रपणे नाकारल्याचे सूत्रांनी सांगितले.

हरिवंश आज सकाळी गांधी पुतळ्याजवळ बसलेल्या आंदोलकांकडे आले. मात्र त्यांचा चहा निलंबित खासदारांनी नाकारल्याने त्यांची ही गांधीगिरी कामी आली नाही. ‘हरिवंश यांचा चहा आम्हाला नको’ अशी स्पष्ट भूमिका तृणमूल कॉग्रेसच्या डेरेक ओब्रायन यांच्यासह सर्वांनी घेतली. ओब्रायन यांनी, जर हरिवंश सच्च्या मनाने आले असतील तर त्यांनी आपल्याबरोबर कॅमेरे का आणले? असा भेदक सवाल उपस्थित केला. हरिवंश यांचे पत्र ज्या गतीने प्रसिद्धीला देण्यात आले व मोदींनी जी तत्काळ दखल घेतली ती पहाता ओब्रायन यांच्या मुद्यात तथ्य असल्याचे जाणकार मानतात. पंतप्रधानांनी हे पत्र शेअर करून ट्विटरवर म्हटले की, या पत्रात सच्चाई व संवेदनाही आहे. 

सर्व देशवासीयांनी हे पत्र जरूर वाचावे. काही तासांपूर्वी ज्यांनी अपमान केला त्यांच्यासाठी हरिवंश चहा घेऊन पोहोचले. 
 

संबंधित बातम्या