Ramcharitmanas Row: रामचरितमानसच नाही तर स्वामी प्रसाद मौर्यांनी 'या' मुद्यावरही तोडले अकलेचे तारे

Ramcharitmanas Row: कोणलाही कोणत्याही धर्माविषयी,जातीविषयी बोलण्याचा अधिकार नाही.
Swami Prasad Maurya
Swami Prasad MauryaDainik Gomantak

Ramcharitmanas Row: समाजवादी पक्षाचे नेते आणि एमएलसी स्वामी प्रसाद मौर्य यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. रामचरितमानसबाबत बोलताना त्यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. तुलसीदासांच्या रामायणावर बंदी घालावी, असे त्यांनी म्हटले आहे.

ज्या पुराणमतवादी साहित्यात दलितांवर अत्याचार झाले आहेत, त्यावर बंदी घालावी. कोणलाही कोणत्याही धर्माविषयी,जातीविषयी बोलण्याचा अधिकार नाही. मात्र रामचरितमानसमध्ये असे काही श्लोक आहेत ज्यामध्ये शु्द्रांना खालच्या जातीचे असल्याचा दाखला त्यांनी दिला आहे.अशा वाक्यरचनेवर आमचा आक्षेप आहे असे त्यांनी म्हटले आहे.

Swami Prasad Maurya
Goa Fraud Case: उत्तर प्रदेशच्या कंपनीचा गोव्यातील 1000 गुंतवणुकदारांना गंडा; सुमारे 10 कोटी लुबाडले

दरम्यान, आता अशी माहिती समोर येत आहे स्वामी प्रसाद मौर्य यांनी फक्त रामचरितमानसवर बंदी घालण्याची मागणी केली नाही तर इतर काही पुजा-अर्चेचाही समावेशही त्यात आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांनी 2014 मध्ये विवाहसंमारंभात गौरी-गणेश पुजा करु नये असे आवाहन दलितांना केले होते.त्यांच्या म्हणण्यानुसार,मनुवादी व्यवस्थेत दलितांना गुलाम बनविण्याची व्यवस्था करुन ठेवली आहे.इतकेच नाही तर त्यांनी असेही म्हटले आहे की,मनुवादी लोक डुकराला वराह भगवान म्हणून सन्मान देऊ शकतात,गाढवाला भवानी, घुबडाला लक्ष्मी म्हणून सन्मान देऊ शकतात मात्र शुद्राला सन्मान देऊ शकत नाहीत.

त्याचबरोबर,नोव्हेंबर 2022 मैनापुरी लोकसभेत समाजवादीच्या पार्टीच्या डिंपल यादव यांच्यासाठी प्रचार करताना त्यांनी भाजप( BJP ) रामाचा सौदा करायला मागेपुढे पाहणार नाही. हे लोक जनता आणि रामाला दोन्हीला विकू शकतात. सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकतात असेही त्यांनी म्हटले होते. दरम्यान, आता त्यांनी रामचरितमानसवर बंदी घालू शकत नसाल तर तुम्ही ते श्लोक तर काढून टाकावेत असे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com