भारतातील IT क्षेत्रातल्या 30 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार? - बँक ऑफ अमेरिका

I T.jpg
I T.jpg

बॅंक ऑफ अमेरिकातर्फे (Bank of America) माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (information technology) वाढत्या ऑटोमेशन तंत्रज्ञानामुळे 30 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील 2022 पर्यंत 16 दशलक्ष लोकांना रोजगार देणाऱ्या देशांतर्गत सॉप्टवेअर कंपन्या (Software companies) 30 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार असल्याचे भाकित वर्तवण्यात आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान कंपन्याना 100 अब्ज डॉलर्सची बचत होईल, असे एका अहवालामधून समोर आले आहे. 

देशांतर्गत आयटी क्षेत्रात जवळपास 16 दशलक्ष लोक काम करतात, त्यामधील 9 दशलक्ष लोक कमी कौशल्य सेवांतील क्षेत्रात बीपीओ सेवांमध्ये कार्यरत आहेत, असे नॅसकॉमच्या मते सांगण्यात येत आहे. (Sword hanging over 3 million IT jobs in India Bank of America)

9 दशलक्ष लोकांपैकी 30 टक्के अर्थात सुमारे 3 दशलक्ष लोक आपल्या नोकऱ्या गमावतील असे बॅंक ऑफ अमेरिकेच्या अहवालानुसार सांगण्यात येत आहे. मुख्यत: ऑटोमेशनमुळे नोकऱ्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जवळपास सात लाख लोकांची आरपीए तंत्रज्ञान जागा घेईल. आणि इतर नोकऱ्या या तंत्रज्ञानामध्ये झालेल्या बदलांमुळे जाणार आहेत. त्याचबरोबर अमेरिकेत आरपीएमुळे सुमारे दहा लाक कामगारांच्या नोकऱ्या जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

100 अब्ज डॉलरची बचत
भारतीय सेवा क्षेत्रामधील कर्मचाऱ्यांच्या पगारावर दर वर्षाला 25,000 डॉलर तसेच अमेरिकन सेवा क्षेत्रामधील 50,000 डॉलर्स खर्च करण्यात येत आहेत, असे अहवालामध्ये म्हटले आहे. 100 अब्ज डॉलरची बचत कर्मचाऱ्याच्या कपातीमुळे होणार आहे. विप्रो, टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा, कोग्निजेंट आणि इतर कंपन्या आरपीए तंत्रज्ञानाद्वारे 2022 पर्यंत 30 लाख कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याचेही यात म्हटले आहे.

आरपीए तंत्रज्ञान नेमकं आहे काय?
आरपीए तंत्रज्ञान हे नेमके रोबोट नसून कठोर आणि नियमित काम करणारे सॉप्टवेअरचा प्रोग्राम आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना एकाच वेळी अधिक वेगवेगळ्या कामावर लक्ष ठेवता येणार आहे. विशेष म्हणजे हे एका साधारण सॉप्टवेअर सारखं नाही कारण ते कर्मचाऱ्यांच्या कामाप्रमाणे ते काम करते. यामुळे अधिकसा वेळ वाचतो. त्याचबरोबर खर्चातही बचत होते. या  व्यापक प्रमाणात ऑटोमेशन तंत्रज्ञान असूनही  चीन (७%), जर्मनी (२६%), भारत (५%), दक्षिण कोरिया, ब्राझील, थायलंड, मलेशिया आणि रशिया या देशांच्या प्रमुख अर्थव्यवस्थांना कामगार टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com