कुरुक्षेत्रात 'महाभारत', तजिंदर बग्गाला हरियाणा पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या दिले ताब्यात

तजिंदर बग्गा (Tajinder Bagga) यांना मोहालीला घेऊन जाणाऱ्या पंजाब पोलिसांच्या पथकाला हरियाणा पोलिसांनी कुरुक्षेत्रातच रोखले.
कुरुक्षेत्रात 'महाभारत', तजिंदर बग्गाला हरियाणा पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या दिले ताब्यात
Tajinder BaggaDainik Gomantak

भारतीय जनता पक्ष (BJP) नेते तजिंदर बग्गा यांना पंजाब पोलिसांनी शुक्रवारी सकाळी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानातून अटक केली. प्रक्षोभक भाषण करणे, धार्मिक उन्माद पसरवणे आणि धमकी देणे या आरोपांचा बग्गा यांना सामना करावा लागत आहे. तजिंदर बग्गा यांना मोहालीला घेऊन जाणाऱ्या पंजाब पोलिसांच्या पथकाला हरियाणा (Haryana) पोलिसांनी कुरुक्षेत्रातच रोखले. आता तजिंदर बग्गाला हरियाणा पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती मिळाली आहे. दिल्ली पोलीस बग्गासोबत दिल्लीत येत आहेत. (Tajinder Bagga was handed over to Delhi Police by Haryana Police)

पंजाब पोलिस सूत्रांनी यापूर्वी सांगितले होते की, ''पंजाब पोलिस हरियाणाच्या डीजीपींना पत्र पाठवत आहेत. पंजाब पोलीस एफआयआरच्या कॉफीसह एक पत्र पाठवत आहेत. हे अपहरणाचे प्रकरण नाही. हरियाणा पोलिस पंजाब पोलिसांचे काम विनाकारण थांबवत आहेत.''

पंजाब पोलिसांच्या सूत्रांनी ही माहिती दिली

पंजाब पोलिसांच्या सूत्रांनी असेही सांगितले होते की, 'दिल्ली पोलिसांचा दावा खोटा आहे की, पंजाब पोलिसांचे एक पथक काल संध्याकाळपासून जनकपुरी पोलिस स्टेशनमध्ये असतानाही दिल्ली पोलिसांनी तेजिंदर पाल सिंग बग्गाबद्दल माहिती दिली नाही. तजिंदर बग्गाच्या वडिलांच्या तक्रारीवरुन दिल्ली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.'

Tajinder Bagga
अरविंद केजरीवाल यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते तजिंदर पाल सिंग बग्गा यांना अटक

दिल्ली पोलिसांचा एफआयआर

दिल्ली पोलिसांच्या एफआयआरनुसार, तक्रारदार प्रीत पाल यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दिली होती. दरम्यान या तक्रारीत म्हटले आहे की, 'काही लोक माझ्या घरात जबरदस्तीने घुसले. त्यानंतर ते मला मारहाण करु लागले. त्यावेळी तेजिंदर म्हणाला, तुला पगडी घालू देत नाही, डॉन पगडी घालू नका.' दिल्ली पोलिसांनीही एफआयआर नोंदवला आहे, कलम 452, 365, 342, 392, 295ए/34 आयपीसी अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

दिल्ली भाजप प्रवक्त्याचे मोठे वक्तव्य

दिल्ली भाजपचे प्रवक्ते नवीन कुमार जिंदाल यांनी दावा केला की, ''बग्गा यांच्या दिल्लीतील घरी सकाळी 8.30 च्या सुमारास सुमारे 50 पोलिसांनी घुसून त्यांना अटक केली. त्याला पगडी घालण्याचीही परवानगी दिली गेली नाही.''

बग्गा यांच्या वडिलांनी हा दावा केला

बग्गा यांच्या वडिलांनी असा दावा केला आहे की, 'जेव्हा मी या घटनेचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा, पोलिसांनी माझ्या तोंडावर ठोसा मारला.' एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी सांगितले की, ''आज सकाळी 10-15 पोलीस आमच्या घरी आले आणि त्यांनी ताजिंदरला ओढून बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी मी माझा मोबाइल फोन उचलला तेव्हा पोलिसांनी मला दुसऱ्या खोलीत नेले आणि धक्काबुक्की केली.''

Tajinder Bagga
''ड्रग ओव्हरडोस'', आठवडाभरात 10 जणांचा मृत्यू; 'आप' सरकारवर विरोधकांचा घणाघात

पंजाब पोलिसांनी जारी केलेले निवेदन

पंजाब (Punjab) पोलिसांनी एक निवेदन जारी करत म्हटले की, ''तेजिंदर पाल सिंग बग्गा यांना तपासात सहभागी होण्यासाठी पाच नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या, परंतु ते जाणूनबुजून तपासात सहभागी झाला नाही. त्यानंतर 6 मे रोजी सकाळी पंजाब पोलिसांनी त्याला जनकपुरी येथील त्याच्या घरातून अटक केली. दिल्लीतील कायदेशीर कारवाईनंतर पंजाब पोलीस बग्गाला पंजाब न्यायालयात हजर करणार आहेत. साहिबजादा अजितसिंग नगर (Mohali) येथील सायबर सेलमध्ये बग्गाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.''

'आप'च्या आमदाराने हे ट्विट केले

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धमकावल्याच्या आरोपाखाली बग्गा यांना अटक करण्यात आली आहे, असे आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) आमदार नरेश बल्यान यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, ''पंजाब पोलिसांनी गुंडांचा पक्ष भाजपचा नेता तजिंदर बग्गा याला अटक केली आहे. त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना ‘जीने नही देंगे’ अशी धमकी दिली होती.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.