कोरोनाची लस घ्या, सोनं मिळवा; जाणून घ्या काय आहे प्रकार?

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 6 एप्रिल 2021

चीनच्या वुहान शहरात सर्व प्रथम आढळल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात सर्वांनाच वेठीस पकडले आहे. या विषाणूला रोखण्यासाठी म्हणून आता लस विकसित करण्यात आली असून, सर्वच देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आलेल्या आहेत.

चीनच्या वुहान शहरात सर्व प्रथम आढळल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात सर्वांनाच वेठीस पकडले आहे. या विषाणूला रोखण्यासाठी म्हणून आता लस विकसित करण्यात आली असून, सर्वच देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आलेल्या आहेत. भारतातील परिस्थिती देखील यापेक्षा वेगळी नसून, कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेऊन अधिकाधिक जणांना लसी देण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. सध्याच्या स्थितीला देशात 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना लस देण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने देखील ज्यांचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त आहे अशांनी लस घेण्याचे आवाहन केले आहे. अशातच गुजरात मधील राजकोट येथे लसीकरणाच्या जागृतीसाठी म्हणून एक नवीनच शक्कल लढवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. (Take the corona vaccine and get a gold nose pin hand blender) 

सावधान! पुढील चार आठवडे असतील अत्यंत भयानक 

देशात कोरोना विरुद्ध लसीकरणाचे अभियान जोरात सुरू आहे आणि आतापर्यंत आठ कोटीहून अधिक लोकांना लसी देण्यात आलेल्या आहेत. सरकार देखील वेगवेगळ्या स्तरावर या लसीकरणाचे महत्व सर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र गुजरात मधील राजकोट मध्ये लसीकरणाच्या जागृतीसाठी म्हणून वेगळीच कल्पना लढवण्यात आली आहे. राजकोट मध्ये कोरोनाची लस घेणाऱ्यांना नाकातील सोन्याची नत देण्यात येत आहे. जास्तीत जास्त जणांनी कोरोनाची लस घ्यावी म्हणून राजकोटमध्ये महिलांना सोन्याची नाकातील पिन आणि पुरुषांना हँड ब्लेंडर दिले जात आहे. 

ICMR चे PM मोदींना पत्र; 18 वर्षावरील लोकांना कोरोनाची लस द्या

गुजरात (Gujrat) मधील राजकोट (Rajkot) मध्ये आतापर्यंत 751 महिलांनी स्वतःला लस घेत सोन्याची नाकातील पिन घेतली आहे. तर, 580 पुरुषांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. आणि त्यांना हँड ब्लेंडर देण्यात आले आहेत. लस घेतल्यानंतर भेटवस्तू देण्याची ही मोहीम राजकोटच्या ज्वेलर्स समुदायाने सुरु केली आहे. राजकोट शहरातील किशोरसिंहजी प्राथमिक शाळेतील लसीकरण शिबिरात लस घेणाऱ्यांना ही भेटवस्तू देण्याची मोहीम ज्वेलर्स समुदायाने चालू केली आहे. आणि जास्तीत जास्त जणांनी कोरोनाची लस घ्यावी हेच यामागील कारण आहे. 

देशात मागील काही दिवसांपासून इतर राज्यांप्रमाणे गुजरातमध्येही कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. मागील एका दिवसात 3160 नवीन प्रकरणे नोंदली गेली असून 15 लोकांचा मृत्यूही झाला आहे. तर, दोन हजार जण हे कोरोनाच्या विळख्यातून ठीक झालेले आहेत. आणि राजकोट मध्ये गेल्या 24 तासांत येथे 283 कोरोनाची नवीन प्रकरणे आढळली आहेत.  

संबंधित बातम्या