शांततेसाठी पाकिस्तानशीही चर्चा करा : डॉ. फारुख अब्दुल्ला

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 20 सप्टेंबर 2020

सीमावादावर चीनशी बोलले जाते. तशाच प्रकारे सीमेवरील शांततेसाठी पाकिस्तानशीही चर्चा करावी, असा सल्ला जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारला दिला आहे. 

दीर्घकाळ नजरकैदेत राहिलेले डॉ. फारुख अब्दुल्ला वर्षभरानंतर संसदेच्या अधिवेशनात सहभागी झाले आहेत. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज प्रथमच संसदेत शून्य काळामध्ये बोलताना शोपियांमधील हत्यांकाडाचा आणि विद्यार्थ्यांना ४ जी नेटवर्कची सेवा मिळावी अशी मागणी केली. तसेच सीमेवर काही आठवड्यांपासून पाकिस्तानशी सुरू असलेल्या चकमकी पाहता शांततेसाठी शेजाऱ्याशी चर्चा करावी, अशी सूचना केली.
 
सभागृहात आपण काहीही वादग्रस्त बोलणार नाही, अशी ग्वाही दिल्यानंतर फारुख अब्दुल्लांना लोकसभाध्यक्षांनी बोलण्याची परवानगी दिली. जम्मू काश्मीरमधील परिस्थिती बिघडलेली असून तेथे काहीही प्रगती नाही. ४ जी नेटवर्क नसल्यामुळे अडचणी येत असून सारे शिक्षण ऑनलाईन सुरू असताना इंटरनेटअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा दावा डॉ.अब्दुल्ला यांनी केला.

 सीमावादावर चीनशी बोलणी होते आहे तर शेजाऱ्याशीही (पाकिस्तान) चर्चा केली जावी, असे त्यांनी सुचविले.

संबंधित बातम्या