निवडून आल्यास मतदारांना हेलिकॉप्टर, रोबोट देणार; तमिळनाडूतील उमेदवाराचे आश्वासनं

दैनिक गोमंतक
गुरुवार, 25 मार्च 2021

मतदारांना (voters) प्रलोभन देण्याची प्रथा तामिळनाडूच्या राजकारणात तशी जुनीच आहे. फार पूर्वीपासून तामिळनाडूत निवडणूक(election) काळात प्रचार करताना राजकीय पक्ष टेलिव्हिजन, फ्रिज, फ्रि रेशन देत आले आहेत, पण आता एका उमेदवाराने या प्रथेला नवा आयाम दिला आहे. मदुरै दक्षिण येथून निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार थुलम सर्वानन यांनी  विजयी झाल्यास आपल्या क्षेत्रातील लोकांना हेलिकॉप्टर(Helicopter) व एक कोटी रुपयांचे आश्वासन दिले आहे. एवढ्यावरच न थांबता थेट चंद्रावर घेऊन जाण्याचे आश्वासनही हा उमेदवार जनतेला देत ​​आहे.(Tamil Nadu candidate promises to provide helicopters robots to voters if elected)

निवडून येण्यासाठी जनतेला वेगवगेळी आश्वासने देणे ही गोष्ट नवी नाही. मात्र हेलिकॉप्टर आणि चंद्रावर जाण्याचे आश्वासन देणाऱ्या थुलम सर्वानन यांच्या बद्दलची महत्वाची बाब म्हणजे त्यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज व्याजाच्या पैशावर भरला आहे. 33 वर्षांचे थुलम सर्वानन यांनी दिलेल्या आश्वासनांवर लोकांच लक्ष आकर्षित झाले आहे, हेच आपले यश असल्याचे मत थुलम सर्वानन यांनी व्यक्त केले आहे. थुलम सर्वानन हे अतिशय गरीब कुटुंबातून आले असून, राजकारणात(Politics) निवडणुकीच्या काळात राजकीय नेते जी खोटी आश्वासने देतात,  त्यावर राग व्यक्त करत, प्रतीकात्मक विरोध करताना त्यांनी ही आश्वासने दिली आहेत. त्यांनी अश्या आश्वासनांची एक मोठी यादीच तयार केली आहे, ज्यामध्ये गृहिणींना मदतीसाठी रोबोट देऊ, मतदार संघाला थंड ठेवण्यासाठी 3000 फूट बर्फाचा डोंगर तयार करू, तसेच मतदार संघातील लोकांना नौकायान करण्यासाठी नौका देऊ, स्पेस रिसर्च सेंटर आणि लॉन्च पॅड उभारू अशा मोठे आश्वासनांचा समावेश  आहे. 

विनोदी शैलीत आर. माधवनने दिली कोरोना बाधित झाल्याची माहिती

सत्तेत असताना नोकरी देणे, शेती सुधारणे, नद्या जोडणे आणि स्वच्छ हवा पुरविणे यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर या मुद्द्यांवर कोणतेच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते काम करत नाहीत, आणि निवडणूक काळात अशी आश्वासने देऊन लोकांना भुलवण्याचे काम केले जाते, असे मत थुलम सर्वानन यांनी व्यक्त केले. तसेच, अश्या आश्वासनांवर विश्वास ठेऊन जर लोक मतदान करत असतील तर ते पूर्णतः व्यर्थ आहे. आणि याच विषयावर लोकांचे लक्ष आकर्षित करून त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी आपण हा उद्योग केल्याचे त्यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या