मेट्रो संबंधी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

मिळनाडूमधील आगामी निवडणुका पाहता मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांच्या सातत्याने केलेल्या मागणीनंतर राज्य सरकारने मेट्रोच्या भाडेदरात मोठी कपात केली आहे.

चेन्नई: तामिळनाडूमधील आगामी निवडणुका पाहता मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांच्या सातत्याने केलेल्या मागणीनंतर राज्य सरकारने मेट्रोच्या भाडेदरात मोठी कपात केली आहे. मेट्रोच्या भाड्यात 20 रुपयांची कपात जाहीर करण्यात आली आहे.

आता मेट्रोचे भाडे 70 रुपयांवरून 50 रुपये करण्यात आले आहे. मात्र किमान भाड्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मेट्रोच्या भाड्याचे हे नवीन दर 22 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. आज शनिवारी तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांनी मेट्रोच्या भाड्यांचे नवीन दर जाहीर केले. राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार आता प्रवाशांना दोन किलोमीटरसाठी दहा रुपये आणि दोन ते पाच किलोमीटरसाठी 20 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, एका प्रवाशाला 5-12 किमी अंतर पार करण्यासाठी 30 रुपये द्यावे लागतील. 

याशिवाय 21 किलोमीटरचे अंतर जाण्यासाठी 40 रुपये आणि 21 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी 50 रुपये मोजावे लागतील. याशिवाय जे प्रवासी क्यूआर कोड किंवा सीएमआरएल स्मार्ट कार्डचा वापर करून मेट्रोचे तिकिट बुक करतील त्यांच्यासाठी 20 टक्के स्वतंत्र सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी प्रवास करणाऱ्यांना त्यांच्या रोजच्या तिकिटांवर 50 टक्के सूट मिळणार आहे. 45 किलोमीटरसाठी 100 रुपयांच्या अमर्यादित डे पासचा वापर करणारे प्रवासी आता विम्को नगरमध्ये जाण्यास प्रवास करू शकणार आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विम्को नगरचे उद्घाटन केले आहे. 

गोवा पर्यटकांसाठी खुशखबर! IRCTC ने दिले “EXOTIC GOA” टूर पॅकेज 

माध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार चेन्नई मेट्रोमध्ये एका दिवसात 1.2 लाख लोक प्रवास करतात. तर एका दिवसात प्रवास करणार्‍यांची संख्या दहा हजारांवरून 75,000 झाली आहे.

 

 

संबंधित बातम्या