तामिळनाडू: मदुराईत कसा साजरा होतोय टप्पम महोत्सव

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात पौर्णिमेच्या संध्याकाळी हा समारंभ होतो. यावर्षी 28 जानेवारी, 2021 रोजी टप्पम म्हणजेच फ्लोट उत्सव साजरा केला जात आहे.

मदुराई:  तामिळनाडूतील मदुराई शहराने संगमच्या काळात आपली ओळख मिळविली आहे. अनेक राजवंशांनी येथे शासन केल्यामुळे या शहरात अनेक सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय परिवर्तन झाले आहे. विजयनगर राजवटीपासून ब्रिटीशांच्या राजवटीपर्यंत या शहरात विविध संस्कृती व लोकं पाहिले गेले. विविधता आणि स्वतः सांस्कृतिक वारशाच्या बाबतीत मदुराई खूप समृद्ध आहे. म्हणूनच भारताच्या स्वातंत्र्यानंतर, तामिळनाडूमधील मदुराई हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनले, येथे बरेच धार्मिक मंदिरे, प्राचीन वास्तू, शाही मेले आणि उत्सव होत असतात.

फ्लोट किंवा टप्पम फेस्टिव्हल म्हणजे काय?

दुर्गा पूजा, नवरात्र इत्यादी सणांसारखाच तेजस्वी दिप आणि टप्पम उत्सव आहे. दक्षिण भारतातील प्रख्यात उत्सवांपैकी एक म्हणजे टप्पम उत्सव ज्यालाच फ्लोट फेस्टिव्हल म्हणूनही आळखले जाते. मुख्यत: तामिळनाडूमधील मदुराई मंदिरात हा उत्सव साजरा केला जातो. तामिळनाडूमधील मदुराई येथे जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात पौर्णिमेच्या संध्याकाळी हा समारंभ होतो. यावर्षी 28 जानेवारी, 2021 रोजी टप्पम म्हणजेच फ्लोट उत्सव साजरा केला जात आहे. या टप्पम उत्सवाच्या वेळी मीनाक्षी अम्मान मंदिराजवळील मरियाम्मान तेप्पकुलम तलावाच्या पाण्यावर हे धार्मिक विधी पार पाडल्या जातात.

राजेंचा इतिहास जगाला कळणार; शिवनेरी किल्ल्याचा विकास होणार -

या उत्सवाची सुरवात कशी झाली?

17व्या शतकात मदुराईचा शासक, राजा तिरुमलाई नायक यांनी पहिल्यांदा हा उत्सव सुरू केला आणि त्यानेच टप्पम किंवा फ्लोट उत्सव असे या उत्सवाला नाव दिले. मुख्य समारंभ बोटीवर मूर्ती घेऊन तो तलाव ओलांडला जातो. तिरुमलाई नायक राजाच्या जयंतीनिमित्त, हा सण साजरा केला जातो. 5 कि.मी. पेक्षा जास्त क्षेत्रावर हा तलाव विस्तारला आहे.

या उत्सवाचे महत्व

या उत्सवाच्या वेळी भाविक सुंदरेसा देवाची पूजा करतात; ज्याला भगवान शिव आणि देवी पार्वतीचा अवतार मानले जाते. देवता मोत्याच्या किरीटांसह चालतात सोन्याच्या बैलावर चालतात. संपूर्ण उत्सवामध्ये भक्तांनी लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधाण केलेल असतात. भक्ती आणि आनंदाच्या गजरात पाणी फेकून नृत्य करतात. एकप्रकारे होळीसारखाच हा खेळ खेळत असतात. हा उत्सव सुमारे बारा दिवस चालतो आणि लोकं या सणाची भक्तीभावाने पूजा करत हा उत्सव साजरा करतात.

राष्ट्रपतींचे संसदिय अभिभाषण : कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच -

या उत्सवाच्या वेळी, देवी मीनाक्षी आणि भगवान सुंदरेश्वर या दोन देवता सुशोभित केल्या आहेत. मग ही मूर्ती वाजंत्री आणि भक्तांसोबत सोन्याच्या पालखीमधून मारिअमॅनटप्पाकुलम नावाच्या तलावावर नेली जाते. देवतांची उपासना करण्यासाठी जेथे ही मुर्ती ठेवली जाते तेथे मंडप तयार केला जातो. मग मूर्ती बोटीच्या प्रवासासाठी नेण्यात येते. ती बोट फुले, हार, आणि दिव्यांनी सुशोभित केली जोते. बोटीला दोर्‍या बांधल्या जातात आणि मोठ्या संख्येने भाविक दोरी खेचून मिरवणुकीत भाग घेतात. मग ती मूर्ती संध्याकाळी एका बेटावर नेली जाते ज्याला सुंदर दिवे लावून चांगले सुशोभित केले जाते. त्यावेळी उडविले जाणारे फटाके उपस्थितांच्या उत्सुकतेचा भाग असतो. हा सोहळा आणि विधी पाहण्याचा क्षण मंत्रमुग्ध करणारा असतो. जगातील कानाकोपऱ्यातील भाविक येथे येतात.  मदुराईतील या सौंदर्याचे, उत्सवाचे आणि या क्षणाचे साक्षीदार तेथिल भावीक असतात. बारा दिवस हा  फ्लोट उत्सव भक्ती आणि आनंदाच्या गजरात साजरा केला जात आहे.

किरीट सोमय्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरूद्ध निवडणुक आयुक्तांकडे तक्रार -

 

संबंधित बातम्या