तामिळनाडू; फटाक्यांच्या कारखाण्याला लागली आग 11 जणांचा मृत्यू

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

तामिळनाडू मधील सत्तूर जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखाण्याला भीषण आग लागली. या आगीत 11जणांचा होरपळून अत्यंत दुर्देवी मृत्यू झाला आहे.

सत्तूर: तामिळनाडू मधील सत्तूर जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखाण्याला भीषण आग लागली. या आगीत 11जणांचा होरपळून अत्यंत दुर्देवी मृत्यू झाला आहे. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. खासगी मालकीच्या कारखाण्यात फटाके तयार करण्यासाठी काही केमिकेल्सचं मिश्रण केलं जात असताना ही दुर्घटना झाली असल्याचे समोर येत आहे. मात्र या केमिकल्समुळे आग विझवण्यात अनेक अडचणी येत होत्या. या कारखाण्यात स्फोट झाला असता त्वरित अग्निशामन दलाच्या 10 गाड्य़ा प्रत्यक्ष घटनास्थळी पोहचल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिडीतांना दोन लाखांची मदत घोषीत केली. तसेच मोदींनी या दुर्घटनेवर शोक व्य़क्त करत राष्ट्रीय मदत कोशातून दोन लाखांची मदत जाहीर केली.तसेच जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली. तसेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनीही तीन लाखांची मदत घोषीत केली आहे.

संबंधित बातम्या