
DMK Minister Viral Video: तमिळनाडूचे मंत्री एसएम नासर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते आपल्या कार्यकर्त्याला दगड मारताना दिसत आहेत. 7 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये ते एका मोकळ्या जागेत उभे राहिलेले दिसत आहेत. त्यांच्या मागे काही लोकही दिसत आहेत. ते एका व्यक्ती पहिल्यांदा रागावतात, नंतर अचानक त्यांचा संयम सुटतो आणि ते एक दगड उचलून द्रमुकच्या कार्यकर्त्याला मारतात.
वास्तविक, मंत्र्याला बसण्यासाठी खुर्ची आणण्यास कार्यकर्त्याने उशीर केल्याने मंत्रिमहोदय संतापले आणि थेट त्यांनी कार्यकर्त्याला दगड मारला.
दरम्यान, एसएम नासर हे दुग्धविकास मंत्री आहेत. केंद्र सरकारने (Central Government) दुधावर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू केल्याची चुकीची माहिती पसरवून नासर यांनी गेल्या वर्षी प्रसिध्दी मिळवली होती. 4 नोव्हेंबर 2022 रोजी राज्य सरकारच्या मालकीच्या अवीनने दुधाच्या दरात वाढ केल्याबद्दल DMK मंत्री पत्रकार परिषदेत बोलत होते.
त्यानंतर, गायीच्या दुधाचा खरेदी दर 32 रुपयांवरुन 35 रुपये करण्यात आला होता. तर म्हशीच्या दुधाचा दर 41 रुपयांवरुन 44 रुपयांवर पोहोचला होता. त्याचवेळी, अवीनच्या फुल-क्रीम दुधाच्या (ऑरेंज पॅकेट) किंमतीत 12 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. आता त्याची किंमत 60 रुपये झाली आहे.
द्रमुक मंत्री नासर म्हणाले होते की, 'केंद्र सरकारने दुधावरही जीएसटी लावला आहे. हा अभूतपूर्व निर्णय आहे. दुधावर जीएसटी लागू झाल्याने दुधाचे दर वाढले आहेत. त्यानंतर भाजपने द्रमुकच्या मंत्र्यावर जोरदार हल्ला चढवला होता. एसएम नासर यांच्यावर हल्ला करताना, तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के अन्नामलाई म्हणाले होते की, 'दूध जीएसटीच्या कक्षेबाहेर आहे हे त्यांना माहितीच नाही.'
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.