Tatas big decision to fill the oxygen shortage in the country
Tatas big decision to fill the oxygen shortage in the country

देशातील ऑक्सिजनची कमतरता भरुन काढण्यासाठी टाटांचा मोठा निर्णय

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. मंगळवारी दोन लाख 94 हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांची कमतरता जाणवू लागली आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. याच पाश्वभूमीवर टाटा उद्योग समूहाने दोन दिवसांपूर्वी पुढाकार घेत 200-300 टन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केलेल्या आवाहनानंतर टाटा ग्रुपने थेट विदेशातून भारतीयांसाठी सुविधा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा ग्रुपने (Tata Group) मोठ्या आकाराचे 24 वाहक ऑक्सिजन सिलेंडर्स आयात करण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भातील माहिती ट्विट करुन देण्यात आली आहे. (Tatas big decision to fill the oxygen shortage in the country)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील सर्व नागरिकांना कोरोनासंबंधी केलेलं आवाहन अत्यंत कौतुकास्पद आहे. टाटा कंपनीकडून भारतातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी जे करावे लागेल ते करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी आम्ही असाच निर्णय घेतला आहे, असं टाटा ग्रुपच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन सांगण्यात आलं आहे.

टाटा ग्रुपने द्रव्य स्वरुपामध्ये असणाऱ्या ऑक्सिजनची देशभरामध्ये वाहतूक करण्यासाठी 24 कंटनेर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात सध्या कोरोनाविरुध्द देत असलेल्या लढ्यामध्ये आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आमचे हे प्रयत्न असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

दोनच दिवसांपूर्वीच टाटा ग्रुपने ट्विटरवरुन 200-300 टन ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला होता. ‘’कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन अत्यंत महत्त्वाचा आहे. देशात निर्माण झालेली आरोग्य आणिबाणी लक्षात घेता आम्ही रोज अनेक राज्यं आणि रुग्णालयांना 200-300 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करत आहोत. या लढाईमध्ये आम्ही देखील तुमच्या सोबत आहोत आपण ही लढाई जिंकू,’’ असा विश्वास टाटा स्टील माहिती देताना व्यक्त केलेला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com