भारतात क्षयरुग्णांमध्ये वाढ

Dainik Gomantak
शुक्रवार, 26 जून 2020

केंद्र सरकारच्या अहवालातील निष्कर्ष

नवी दिल्ली

क्षयरोगासंबंधी केंद्र सरकारच्या ताज्या अहवालानुसार देशभरात २०१९ मध्ये २४.०४ क्षयरुग्णांची नोंद झाली. रुग्णसंख्येमध्ये २०१८ च्या तुलनेत १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच निदान न झालेल्यांची संख्या तीन लाखांनी घटली आहे. नोंदणी झालेल्या क्षयरुग्णांसाठी ‘एचआयव्ही’ चाचणीचे प्रमाण २०१८ मध्ये ६७ टक्के होते ते २०१९ मध्ये ८१ टक्क्यांवर पोचले आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी (ता. २४) हा क्षयरोगावरील वार्षिक पाहणी अहवाल प्रकाशित केला. क्षयरोग निर्मूलनाच्या ‘निःक्षय’ यंत्रणेअंतर्गत क्षयरुग्णांसाठी थेट लाभ हस्तांतरणाशी (डीबीटी) संबंधित नियमावली, प्रशिक्षण प्रारूप तसेच त्रैमासिकाचेही प्रकाशन झाले. जगभरात क्षयरोग निर्मूलनासाठी २०३० हे उद्दिष्टपूर्ती वर्ष ठरविण्यात आले आहे. मात्र भारताने २०२५ मध्येच हे उद्दिष्ट गाठण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी देशभरात प्रयोगशाळांची संख्या वाढविणे, रोगनिदान सुविधांचा विस्तार करणे, यावरही सरकारने भर दिला असल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.
देशभरात ४.५ लाख गावांमध्ये डॉट केंद्राद्वारे उपचार केले जात आहेत. क्षयरोग निर्मूलनासाठीच्या प्रयत्नांबद्दल गुजरात, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा आणि नागालँड यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी गौरविण्यात आले. देशभरात

अहवालातील निष्कर्षानुसार...
१९ टक्के
२०१८ च्या तुलनेत २०१९ मधील वाढ

२४.०४ लाख
क्षयरुग्णांची नोंदणी

२.९ लाख
निदान न झालेल्यांच्या संख्येत घट

क्षयरुग्णांसाठी एचआयव्ही चाचणीचे प्रमाण

८१ टक्के
२०१९ मध्ये

६७ टक्के
२०१८ मध्ये

यशस्वी उपचाराचे प्रमाण

८१ टक्के
२०१९ मध्ये

६९ टक्के
२०१८ मध्ये

संबंधित बातम्या