शिक्षक बापानंचं 18 वर्षीय मुलीवर केला बलात्कार

आपल्याच मुलीवर बलात्कार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बिहारमधील समस्तीपूर येथून एका 50 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली.
शिक्षक बापानंचं 18 वर्षीय मुलीवर केला बलात्कार
BiharDainik Gomantak

आपल्याच मुलीवर बलात्कार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बिहारमधील समस्तीपूर येथून एका 50 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली. समस्तीपूरमधील रोसेरा येथील शिक्षक तसेच रहिवासी असलेल्या या व्यक्तीवर आपल्या स्वत:च्या 18 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि धमकी दिल्याचा आरोप करण्यात आले आहेत. तिने वडिलांचा पर्दाफाश करण्यासाठी छुपा कॅमेरा वापरून सर्व प्रकरणाचा व्हिडिओ शूट केला. (The teacher father has raped his 18 year old daughter)

Bihar
''पाकिस्तानचे 200 दहशवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत''

पोलिसांनी वडिलांची चौकशी केली असू या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का याचा देखील पोलीस तपास घेत आहेत. रोसेरा उपविभागाचे डीएसपी सहियार अख्तर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मुलीच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवला आणि आरोपी वडिलांना व्हिडिओची माहिती मिळाल्यानंतर अटकेत घेतले आहे.

आरोपीवरती कायदेशीर कारवाई केली जात आहे... आणि निवेदनाच्या आधारे इतर आरोपींचा तपास घेतला जात आहे. ठिकठिकाणी छापे देखील टाकले जात आहेत,” डीएसपी सहियार अख्तर यांनी घडलेला सर्व प्रकार माध्यमांना सांगितला आहे. असेही म्हटले जात आहे की पीडितेच्या आईने या हल्ल्याला विरोध केलेला नाही आणि तिचे मामा तिच्यावर या घटनेवर शांत राहण्यासाठी दबाव देखील आणत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.