अभ्यास करायला नको म्हणून गुजरात च्या मुलाचा दिड लाख रूपये घेऊन गोव्यात पळ

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

गुजरातमधील वडोदरा येथील 14 वर्षाच्या मुलाने दीड लाख रुपये घेऊन गोव्यात पळ काढला आणि तेथील क्लबमध्ये त्याने तो पैसा उधळला.

वडोदरा: पालकांनी अभ्यासावर लक्ष न दिल्याबद्दल फटकारल्यानंतर गुजरातमधील वडोदरा येथील 14 वर्षाच्या मुलाने दीड लाख रुपये घेऊन गोव्यात पळ काढला आणि तेथील क्लबमध्ये त्याने तो पैसा उधळला.

दहावीच्या अभ्यासावर लक्ष न दिल्याने किशोरच्या पालकांनी त्याला वेळ वाया घालतो म्हणीन फटकारले होते. त्याच दिवशी आजोबांनीही अभ्यासाकडे लक्ष न दिल्याबद्दल त्यांना फटकारले. त्यामुळे तो चिडून नाराज होऊन घरातून निघून निघून गेला. आणि त्याने थेट गोवाच गाठले.गोव्याला जाण्यासाठी तो ट्रेनमध्ये रेल्वे स्थानकात गेला, परंतु त्याच्याकडे  आधार कार्ड नसल्याने त्याला ट्रेनचे तिकीट मिळाले नाही. त्यानंतर तो अमितनगर मंडळाकडे निघाला आणि बस मध्ये बसून पुण्याला गेला. पुण्यात पोहोचल्यानंतर तो गोव्याच्या बसमध्ये चढला आणि त्याने थेट गोवाच गाठले.

दरम्यान, त्याच्या पालकांना त्याला शोधण्यात अपयश आल्यानंतर पोलिसांत मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली. टाईस्म ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्या घरातून दीड लाख रुपये गायब झाल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

पोलिसांनी असे सांगितले आहे की, दीड लाख रुपये घेऊन या मुलाने गोव्यातील क्लबमध्ये मनसोक्त आनंद लुटला.  जेव्हा काही वेळानंतर त्याला हे समजले की पैसे संपणार आहेत, तेव्हा त्याने गुजरातकडे परत जाण्याचा निर्णय घेतला, परंतु त्याच्या घरी जाण्याचा नाही. पुण्यात परत पोहचल्यानंतर त्याने एक नवीन सिमकार्ड विकत घेऊन आपल्या सेलफोनमध्ये टाकले  त्यानंतर तो गुजरातचं तिकीट बुक करण्यासाठी एका ट्रॅव्हल एजन्सी कार्यालयात गेला.

पोलिसांनी त्या किशोरवयीन मुलाच्या मोबाईल फोनवर पाळत ठेवली होती. नवीन सिम टाकल्यानंतर जेव्हा त्याने मोबाइल फोन चालू केला तेव्हा पोलीसांनी त्याचे लोकेशन ट्रॅक केले. आणि ताबडतोब ट्रॅव्हल एजन्सी कार्यालयात पोहचले सोडले नाही. यानंतर, पुणे पोलिसांनी वडोदरा पोलिस स्टेशनशी संपर्क साधला आणि त्या मुलाला ताब्यात घेतले.  पुणे पोलिसांनी 25 डिसेंबर रोजी मुलाला वडोदरा पोलिसांच्या ताब्यात दिले आणि त्याला शनिवारी त्याच्या घरी परत आणण्यात आले.

 

 

संबंधित बातम्या